Search This Blog

Wednesday 24 June 2020

बेरोजगार उमेदवारांनी महास्वयम संकेतस्थळावर नोंदणी करावी

बेरोजगार उमेदवारांनी महास्वयम संकेतस्थळावर
नोंदणी करावी
जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्राचे आवाहन
चंद्रपूरदि.24 जून: कोविड-19 मुळे लॉकडाऊन घोषित केलेले असल्यामुळे जिल्ह्यातून बरेच परप्रांतीय कामगार स्वगावी परत गेले आहे. त्यामुळे ज्या बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची आवश्यकता आहे. तसेच कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in  या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने नोंदणी केलेली नाही.त्यांनी ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करावी,असे आवाहन सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भैय्याजी येरमे यांनी केले आहे.
ज्या उमेदवारांनी यापूर्वी नोंदणी केलेली आहे. त्यांनी आपली प्रोफाईल अद्यावत (जसे- संपूर्ण शैक्षणिक पात्रता,अनुभव,अवगत असलेल्या भाषा,स्किल इ) करावी. ऑनलाईन पध्दतीने जून्या व नविन नोंदणी केलेल्या सर्व उमेदवारांनी आपला युझर आयडी व पासवर्डने लॉगीन करुन वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांचे अवलोकन करावे.स्वतःच्या शैक्षणिक पात्रता व अनुभवानुसार योग्य पदाकरीता त्या कंपनीकडे ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावा. सदर नोंदणी ही विनामुल्य आहे. अधिक माहितीसाठीकाही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,प्रशासकीय भवनपहीला माळाहॉल क्र.5/6 चंद्रपूर या कार्यालयाशी किंवा 07172- 252295 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
00000

No comments:

Post a Comment