Search This Blog

Monday 15 June 2020

आज जिल्हा पोलीस अधीक्षकांची कायदा व सुव्यवस्थेविषयी मुलाखत

16 जुन रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांची
कायदा व सुव्यवस्थेविषयी मुलाखत
चंद्रपूर,दि.15 जून: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा पोलीस विभाग सज्ज असून पोलीस विभागाअंतर्गत करण्यात आलेल्या उपाययोजना तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था विषयीची जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांची मुलाखत उद्या 16जुन रोजी सकाळी 7:45 वाजता आकाशवाणी केंद्र चंद्रपूर येथून प्रसारित होणार आहे.
कोरोना विषयी जनजागृती संदर्भात नागरिकांना कोरोनाविषाणू माहिती व प्रतिबंधात्मक उपाययोजनेविषयी माहिती व्हावी यासाठी आत्मभान अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपायोजना याविषयीची माहिती नागरिकांना मिळावी यासाठी प्रशासनातील अधिकारी यांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत.
जिल्हा माहिती कार्यालय चंद्रपूरद्वारे हा कार्यक्रम निर्मित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था तसेच पोलीस प्रशासनाची तयारी याविषयीची मुलाखत आकाशवाणी केंद्र चंद्रपूर येथून ऐकावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
00000 

No comments:

Post a Comment