Search This Blog

Monday 15 June 2020

जिल्हाधिकारी साधतील 17 जूनला बुधवारी नागरिकांशी संवाद

जिल्हाधिकारी साधतील 17 जूनला बुधवारी नागरिकांशी संवाद
नागरिकांना थेट विचारता येणार प्रश्न
चंद्रपूरदि. 15 जून: कोरोना जनजागृतीसाठी आत्मभान अभियान जिल्हा प्रशासनाने सुरू केले आहे. या आत्मभान अभियानांतर्गत आकाशवाणी केंद्रावर फोन-इन कार्यक्रम  सुरू झालेला आहे. 20 जून शनिवार रोजी प्रसारित होणाऱ्या कोरोना आणि प्रशासनाची तयारी या विषयावर 17 जून बुधवार रोजी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार जिल्ह्यातील नागरिकांशी संवाद साधणार आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी कशी आहेजिल्ह्यातील कोरोना विषयीच्या काळामधील सद्यस्थिती काय आहेप्रशासनातील यंत्रणा कशा पद्धतीने काम करीत आहे असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील तर आपण थेट फोन करून हे प्रश्न विचारू शकता.
या फोन-इन कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण दिनांक 17 जून बुधवार रोजी होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत जास्तीत जास्त 07172-254634 या संपर्क क्रमांकावर संपर्क करून आपल्या मनातील प्रश्न विचारू शकता. या कार्यक्रमाचे प्रसारण दिनांक 20 जून शनिवारी रोजी सकाळी 10:30 वाजता होणार आहे.
कोरोना आणि प्रशासनाची तयारी याविषयी नागरिकांमधील असलेल्या प्रश्नांचं फोन करून निरसन करू शकता. नागरिकांच्या प्रश्नांचशंकांच निरसन जिल्‍हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार करणार आहेत. तेव्हा अवश्य फोन करा आणि जास्तीत जास्त नागरिकांनी फोन-इन या कार्यक्रमात सहभागी व्हावेअसे आवाहन करण्यात आले आहे.
00000

No comments:

Post a Comment