Search This Blog

Friday 26 June 2020

आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह भाडेतत्त्वावर चालविण्याकरिता अर्ज सादर करावा

आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह
भाडेतत्त्वावर चालविण्याकरिता अर्ज सादर करावा
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चिमूरचे आवाहन
चंद्रपूर,दि. 26 जून:प्रकल्प अधिकारीएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचिमूर अंतर्गत येत असलेली आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृहनागभिड ता. नागभिड जि. चंद्रपूर येथे शासनाकडून 75 विद्यार्थीनीच्या क्षमतेचे वसतीगृह भाडेतत्त्वावर चालविण्याकरिता इच्छूकांनी अर्ज सादर करावाअसे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प के.ई.बावनकर यांनी केले आहे.
वसतिगृह भाडेतत्त्वावर चालविण्यास मंजुरी असून शासकीय इमारत उपलब्ध नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंजूर दरानुसार भाडेतत्वावर इमारत घ्यावयाची असल्याने माहे 1 जुलै 2020 ते 30 जुन 2023 या कालावधीसाठी किंवा 1  जुलै 2020 ते शासकीय इमारत उपलब्ध होईपर्यंत 500 चौ.मी. चे पक्के बांधकाम असलेली चारही बाजुंनी संरक्षण भिंत असलेली 75 व्यक्तींना पुरेशी होईल अशी इमारत भाडेतत्वावर शासनास घेणे आहे. त्याकरीता इमारतीचे कागद पत्रासहीत अर्ज मागविण्यात येत आहे. तरी इच्छुकांनी प्रकल्प कार्यालयचिमूर येथे दिनांक 29 जून 2020 पर्यंत अर्ज सादर करावेअसे आवाहन प्रकल्प अधिकारीएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचिमूर यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment