Search This Blog

Friday, 7 June 2024

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामार्फत जागतिक पर्यावरण दिन




ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामार्फत जागतिक पर्यावरण दिन

चंद्रपूरदि. 7 : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात असलेल्या गावातील स्वयंसहायता महिला बचत गटामार्फत वने व वन्यजीव संवर्धन संदर्भातील "भरारी" उपक्रम राबविण्यात येत आहे. या समृद्ध वनाचे संवर्धन व संरक्षण पिढ्या न पिढ्या स्थानिक समुदायाने केले आहे. यामध्ये महिलांचे विशेष योगदान आहे. वनावर स्थानिकांचा अधिकार महत्वपूर्ण आहे. म्हणून भरारी सोबतच वनातील आनंदाचा एक दिवस हा आनंददायी कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

 या कार्यशाळेत स्थानिक बफर क्षेत्रातील महिलांना ताडोबा वनाचे स्थानिक समुदायांच्या आयुष्यातील महत्वमानव-प्राणी संघर्ष टाळण्यासाठी घेण्यात येणारी काळजीशासकीय व इतर यंत्रणेमार्फत पर्यायी रोजगाराच्या संधी या महत्वपूर्ण विषयावर चर्चा व सादरीकरण करण्यात येते आणि स्थानिक महिलांकरिता ताडोबा वनभ्रमंती सुध्दा करण्यात येते. 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मोहर्ली बफर क्षेत्रातील मोहर्ली या गावातील बचत गटाच्या सहभागाने या उपक्रमाची सुरवात केली. मोहर्ली वनपरिक्षेत्रामध्ये एकूण 10 गावे असून प्रति दिवस एक गाव व 40 महिला यांच्यात सहभाग असणार आहे. असे 98 महिला बचत गटाच्या एकूण 400 महिलांच्या सहभागाने हा महत्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. यापूर्वी ताडोबा वन परिक्षेत्रातील 11 गावातील 178 महिला बचत गटाच्या 445 महिला या उपक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या.

स्थानिक समुदाय या वनाचा महत्वपूर्ण घटक असून वनाचे व वन्यजीवांचे संवर्धन व संरक्षण हे स्थानिक समुदयाच्या महत्वपूर्ण सहभागने परिपूर्ण होऊ शकते.अशा विविध उपक्रमाअंतर्गत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प स्थानिक समुदयाला पाठबळ देऊन त्यांच्या करिता नावीन्यपूर्ण उपक्रम नियमित राबवित असते. सदर "भरारी" उपक्रम डॉ. जितेंद्र रामगावकर मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प यांच्या मार्गदर्शनाखाली तर उपसंचालक (बफर) कुशाग्र पाठक, आनंद रेड्डी (कोर) यांच्या विशेष योगदानातून राबविण्यात येत आहे.

या कार्यकामाचे समन्व्यक व प्रशिक्षक प्रफुल्ल सावरकरपर्यावरण शिक्षण अधिकारीताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हे आहे. सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी  वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण गोंडसंतोष थिपेश्री. चिवंडेवनपाल श्री. कामठकरश्री. सोयाम व श्री. जुमडे तसेच क्षेत्रीय वन कर्मचारी यांचे विशेष योगदान आहे.

०००००००

सर्वोच्च न्यायालयात विशेष लोक अदालत सप्ताह

 

सर्वोच्च न्यायालयात विशेष लोक अदालत सप्ताह

चंद्रपूरदि. 7 : सर्वोच्च न्यायालयनवी दिल्ली येथे दिनांक 29 जुलै  ते 3 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये विशेष लोक अदालत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर लोक अदालतीमध्ये सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवले जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ज्या पक्षकारांची  प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यास व ती तडजोडीने मिटावी,  अशी ज्यांची इच्छा असेल ती प्रकरणे विशेष लोक अदालतीमध्ये  ठेवता येऊ शकते. उपरोक्त लोक अदालतीमध्ये पक्षकार प्रत्यक्ष किंवा आभासी पद्धतीने सहभाग घेवू शकतात.

विशेष लोक अदालतीचे फायदे  : साध्या व सोप्या पद्धतीने वाद मिटवता येतो. झालेल्या तडजोडीचा निवाडा अंतिम व अंमलबजावणी होऊ शकणार असतो. वेळेची व पैशाची बचत होते. तडजोड झाल्यास न्यायालयीन शुल्क परत मिळते.

            जिल्ह्यातील प्रकरणे सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष लोक अदालतीमध्ये ठेवण्यासाठी संबंधित वकिलांना कल्पना द्यावी किंवा अधिक माहिती हवी असल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचंद्रपूर किंवा संबंधित तालुका विधी सेवा समिती यांच्याकडे संपर्क साधावाअसे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशीयांनी केले आहे.

०००००००

बाल धोरण कृती आराखड्याबाबत हरकती व सूचना आमंत्रित


बाल धोरण कृती आराखड्याबाबत हरकती व सूचना आमंत्रित

चंद्रपूरदि. 7 : महिला व बाल विकास विभागांतर्गत बाल धोरणाचा प्रारुप मसुदा तयार करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती व शासनाचे अधिकारी यांचा समावेश असलेली समिती गठित करण्यात आली आहे. सदर समितीने महाराष्ट्र राज्य बाल धोरण व कृती आराखडा 2022 मसुदा तयार केला  आहे.

सदर प्रस्तावित बाल धोरण व कृती आराखडा  हा इंग्रजी  व मराठी भाषेमध्ये महाराष्ट्र शासनाचे https://womenchild.maharashtra.gov.in व  https:www.wedcommpune.com  या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. तरी सदर प्रस्तावित बाल धोरण हे मुळामध्ये इंग्रजी भाषेमध्ये तयार करण्यात आले असून त्यांचे मराठी भाषेमध्ये भाषांतर करण्यात आले आहे. बाल धोरण व कृती आराखड्यामध्ये आवश्यक बाबीसुचना सुधारणा तसेच मराठी भाषेमध्ये भाषांतर करण्यात आलेल्या मसुद्यामध्ये शब्द रचनाव्याकरण या संदर्भाने  हरकती व सूचना नागरिकांकडून मागविण्यात येत आहे.

            प्रस्तावित महाराष्ट्र राज्य बाल धोरण व कृती आराखडा 2022  च्या संदर्भाने नागरीकांच्या हरकती व सूचना दिनांक 30 जून 2024 रोजी सांयकाळी 6.15 वा. पर्यंत महिला व बाल विकास आयुक्तालय२८ राणीचा बागजुन्या सर्किट हाऊस जवळ, पुणे – 01 या पत्त्यावर अथवा childpolicy@gmail.com या ईमेल वर पाठविण्यात याव्यात, असे आवाहन महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.

                                                                ००००००

पुन्हा उधळला दोन बालविवाहाचा घाट


पुन्हा उधळला दोन बालविवाहाचा घाट

Ø चाईल्ड हेल्पलाईन आणि जिल्हा बालसंरक्षण कक्षाची कार्यवाही

चंद्रपूरदि. 7 : पालकांच्या समुपदेशाने जिल्ह्यात एकाच दिवशी दोन बालविवाह रोखण्यात चाईल्ड हेल्पलाईन आणि जिल्हा बालसंरक्षण कक्षाला यश प्राप्त झाले. विशेष म्हणजे जिवती तालुक्यातील 5 बालविवाह यावर्षी यंत्रणेनी थांबविले आहे.

चंद्रपूरपासून दूर अंतरावर असलेल्या जिवती तालुक्यातील गावांमध्ये बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती चाईल्ड हेल्पलाईन च्या 1098 क्रमांकावर मिळाली. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी चंद्रपूर आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम दोनही बालिका अल्पवयीन असल्याचा पुरावा सहाय्यक संरक्षण अधिकारी परविन शेख, अंगणवाडी सेविका व सुपरवायजर यांच्या मदतीने प्राप्त करण्यात आला. यानंतर चाइल्ड हेल्पलाईन आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे कर्मचारी दोन्ही बालिकेच्या बालविवाह होत असलेल्या गावात पोहचले व ग्रामीण बाल संरक्षण समिती सदस्यांच्या मदतीने दोन्ही बालविवाह थांबविले.

दोन्ही अल्पवयीन बालिकांच्या कुटुंबाकडून बालविवाह करणार नसल्याचे शपथपत्र लिहून घेण्यात आले. या संपूर्ण कारवाही दरम्यान जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दिपक बानाईतजिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकरचाईल्ड हेल्पलाईनचे अभिषेक मोहुर्ले, प्रकल्प समन्वयक प्रदिप वैरागडे, सुपरवायझर अंकुश उराडे,  किरण बोहरा आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या हर्षा वऱ्हाटे  यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

००००००

Saturday, 1 June 2024

जिल्हाधिका-यांकडून स्ट्राँग रुमसह मतमोजणी व्यवस्थेची पाहणी







 जिल्हाधिका-यांकडून स्ट्राँग रुमसह मतमोजणी व्यवस्थेची पाहणी

Ø एकूण मतमोजणी टेबल 101उपलब्ध कर्मचा-यांची संख्या 379

Ø प्रशासनाकडून युध्दपातळीवर तयारी

चंद्रपूरदि. 1 : निवडणूक प्रक्रियेमधील अतिशय महत्वाचा समजला जाणारा मतमोजणीचा टप्पायेत्या मंगळवारी (4 जून) होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाची युध्द पातळीवर तयारी सुरू आहे. मतमोजणी करीता प्रशासन पूर्णपणे सज्ज असून या व्यवस्थेची पाहणी करण्याकरीता निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी वखार महामंडळाच्या गोडाऊन येथील स्ट्राँग रुमसह मतमोजणी केंद्राची पाहणी केली व सूचना दिल्या.

13- चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल 2024 रोजी पार पडली. जवळपास दीड महिन्यांच्या कालावधीनंतर येत्या 4 जून रोजी पडोली एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळाच्या गोडावून येथे मतमोजणी होणार आहे. या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी मतमोजणी केंद्राला भेट दिली. प्रत्यक्ष मतमोजणीकरीता येथे असलेल्या एकूण टेबलची व्यवस्थाउमेदवारनिवडणूक प्रतिनिधी व मतमोजणी प्रतिनिधींच्या बसण्याची व्यवस्थालावण्यात आलेले बॅरेकेटींगसीसीटीव्हीविद्युत व्यवस्थाईव्हीएम असलेल्या स्ट्राँगरूमचा मार्गसुरक्षा व्यवस्थामिडीया सेंटर आदींचा त्यांनी आढावा घेतला. तसेच संबंधितांना सुचनाही केल्या.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडेउपजिल्हाधिकारी दगडू कुंभारउपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरीउपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्रामअजय चरडेजिल्हा सुचना विज्ञान अधिकारी सतीश खडसे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

  मतमोजणीकरीता एकूण टेबल व फे-यांची संख्या : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघासाठी (ईव्हीएम मतमोजणी) प्रत्येकी 14 टेबल याप्रमाणे एकूण 84 टेबलटपाली मतपत्रिका मोजण्याकरीता 9 टेबल आणि ईटीपीबीएमएस (सर्व्हिस व्होटर मतपत्रिका) मोजण्याकरीता 8 टेबल असे एकूण 101 टेबल राहणार आहेत. तसेच राजुरा विधानसभा मतदारसंघाच्या 24 फे-याचंद्रपूर - 28बल्लारपूर – 26वरोरा – 25वणी – 25आणि आर्णि मतदारसंघाच्या मतमोजणीच्या 27 फे-या होणार आहेत.

नियुक्त कर्मचा-यांची संख्या : प्रत्यक्ष मतमोजणी करीता आणि अतिरिक्त स्टाफ धरून 120 टक्के याप्रमाणे एकूण 379 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यात मतमोजणी पर्यवेक्षकांची संख्या 122मतमोजणी सहायक 140 आणि सुक्ष्म निरीक्षकांची संख्या 117 आहे. 

मतमोजणी केंद्रावर नियुक्त सुरक्षा व्यवस्था : मतमोजणी आवाराच्या / परिसराच्या सभोवताली 100 मीटर परिघापासून राज्य पोलिसमतमोजणी आवाराच्या प्रवेशद्वारावर राज्य सशस्त्र पोलिस आणि मतमोजणी कक्षाच्या द्वाराजवळ केंद्रीय सशस्त्र पोलिस दल तैनात आहे.

मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तुंना प्रतिबंध : मतमोजणी केंद्रात मोबाईलकॅमेरालॅपटॉपआयपॅडतसेच कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तु नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनासुध्दा केवळ मिडीया सेंटरमध्येच मोबाईलचा वापर करता येईल. प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रात जातांना मोबाईलकॅमेरा मिडीया सेंटर येथे जमा करावा लागेल.

उमेदवार / प्रतिनिधींना अत्यावश्यक सुचना : मतमोजणी परिसरात तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था असल्याने प्रत्यक्ष मतमोजणी स्थळी एकदाच प्रवेश दिला जाईलपरिसर सोडल्यास पुन्हा प्रवेश नाकारण्यात येईल. उमेदवार / उमेदवारांचे प्रतिनिधींनी आपले मोबाईल / इलेक्ट्रॉनिक संयत्रे जमा करणे बंधनकारक राहील.

०००००००