Search This Blog

Monday, 1 July 2024

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ पहिल्या टप्प्यात अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 जुलैपर्यंत

 ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ पहिल्या टप्प्यात अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 जुलैपर्यंत

चंद्रपूरदि. 1 : राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री – माझा लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. योजनेची सुरूवात 1 जुलै पासून करण्यात आली असून पहिल्या टप्प्यातील अर्ज 1 ते 15 जुलै पर्यंत भरण्याची मुदत आहे. त्यानंतरही योजना सुरू राहील.

योजनेचा उद्देश : 1) राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, 2 ) त्यांचे आर्थिक - सामाजिक पुनर्वसन करणे, महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे, 3) महिला व मुलींच्या सशक्तीकरणास चालना मिळणे, 4) महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांचे आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे.

 लाभार्थी पात्रता : 1) वय 21 ते 60 वर्षे असणारी महिला. 2) महाराष्ट्र राज्याची रहिवासी महिला. 3) विवाहितविधवाघटस्फोटित परित्यक्त्यानिराधार महिला. 4) कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लक्ष पेक्षा कमी असणे गरजेचे.

अपात्रता : 1) कुटुंबातील सदस्य आयकर दाता असल्यास2) सरकारी नोकरी3) आजी/माजी आमदार/खासदार 4) कुटुंबाच्या मालकीची 5 एकर पेक्षा जास्त जमीन असणारे6) चार चाकी गाडी असणारे.

अर्ज करण्याची पद्धत : अर्ज नि:शुल्क अंगणवाडी सेविका यांचेकडे भारता येईल. अर्ज विहित नमुन्यात भरून व त्याला आवश्यक कागद जोडून अंगणवाडी सेविकाग्रामसेवकसेतू केंद्रवार्ड अधिकारी यांना देता येईल. वरील सर्वांकडून अर्ज ऑनलाईन भरून घेता येईल.

आवश्यक कागदपत्रे : योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज, लाभार्थ्याचे आधारकार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र / महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपर्यंत असावे), बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड, सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

 अडचणी असल्यास येथे करा संपर्क : अर्ज भरतांना काही समस्या असल्यास जिल्हा स्तरावर सुविधा केंद्र स्थापन केले आहे. त्यासाठी संपर्क क्रमांक 7972059274 तसेच महिला हेल्प लाईन 181 वर संपर्क करता येईल.

अर्जासाठी लागणारे उत्पन्न दाखले तसेच रहिवासी प्रमाणपत्रे तयार करण्यासाठी विविध पातळीवर नगरपालिका मुख्याधिकारी, महानगरपालिका अधिकारीतहसीलदार यांनी कॅम्प आयोजित करून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. तसेच मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिल्याचे  महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांनी कळविले आहे.

००००००

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अप्रेंटिस भरती मेळावा



शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अप्रेंटिस भरती मेळावा

चंद्रपूरदि. 1 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर आणि मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने अप्रेंटीस भरती मेळावा नुकताच घेण्यात आला. यावेळी  अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य आर. बी. वानखेडे तर प्रमुख अतिथी म्हणून बीटीआरआय विभागाच्या सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार प्रणाली दहाटे व प्रमुख मार्गदर्शक म्हणून संभाजीनगर येथील इगल हायटेक कंपनीचे सुनील राठोडनागपूर येथील वैभव एन्टरप्राईजेसचे पराग कपाळेजय महाराष्ट्र कंपनीचे श्री. नडेराईट वॉक फाउंडेशनचे प्रतिनिधी कपिल बांबोळे  आदी उपस्थित होते.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थांना अप्रेंटीशीपच्या माध्यमातून कंपनीत काम करण्याची संधी मिळत असते. या संधीचा विद्यार्थ्यांनी अवश्य लाभ घ्यावाअसे आवाहन प्राचार्य आर.बी. वानखेडे यांनी केले तर बीटीआरआय विभागासंबंधित महत्त्वाची माहिती प्रणाली दहाटे यांनी दिली.

प्रास्ताविक बंडोपंत बोढेकर यांनी केले. संचालन अर्पिता घाघरगुंडे यांनी केले तर आभार श्री. दोरखंडे यांनी मानले. यावेळी गटनिदेशक एन. एन. गेडकररासेयोचे कार्यक्रम अधिकारी बंडोपंत बोढेकरश्री. लेडांगे आदींची उपस्थिती होती.

००००००

नियोजन भवन येथे सांख्यिकी दिन


नियोजन भवन येथे सांख्यिकी दिन

चंद्रपूर, दि. 1 : राष्ट्रीय सांख्यिकी दिनानिमित्त जिल्हा नियोजन समितीजिल्हा मानव विकास समिती व जिल्हा सांख्यिकी कार्यालय चंद्रपूर यांच्या  संयुक्त विद्यमानाने नियोजन भवन येथे सांख्यिकी दिन साजरा करण्यात आला.

यावेळी भारतीय सांख्यिकीचे जनक प्रा. प्रशांतचंद्र महालनोबीस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. निर्णय घेण्यासाठी डेटाचा वापर करणे या थीम वर सावेळी उपस्थितांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला प्र. जिल्हा नियोजन अधिकारी राजेंद्र कोंडावारप्र. उपसंचालक नरेश धोटेसहायक जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) मुजीब शेखलेखाधिकारी श्री. बेलेप्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अजय भेंडे यांनी तर आभार अमित पाटील यांनी मानले. सदर कार्यक्रमाला जिल्हा नियोजन समिती कार्यालयातील तसेच सांख्यिकी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

००००००

चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक ‘1098’ ठरतोय मुलांच्या समस्येवर समाधान


चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक ‘1098’ ठरतोय मुलांच्या समस्येवर समाधान

 चंद्रपूरदि. 1 : महिला व  बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा चाईल्ड  हेल्पलाईन आणि रेल्वे चाईल्ड हेल्पलाईन कार्यान्वित असून दोन  महिन्यात जिल्हयातील 75 मुलांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. यामध्ये बालविवाहबालशोषणबालकामगारबालभिक्षेकरीनिवाऱ्याची गरज असलेली,  हरवलेली बालकेसमुपदेशनाची गरजकौटुबिंक हिंसाचार पिडीत बालके आदी प्रकारच्या मदतीसाठी चाईल्ड हेल्पलाईन 1098 ला हाक दिलेल्या बालकांचा समावेश आहे.

चाईल्ड   हेल्पलाईन 1098 ही मोफत टेलिफोनिक सेवा आहेजी 24 तास 7 दिवस कार्यरत असते. 0 ते 18 वर्ष वयोगटातील काळजी आणि  संरक्षणाची गरज असणारी बालके यांच्यासाठी आपली सेवा देत असते. 1098 या टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यावर हा फोन चाईल्ड हेल्पलाईन कंट्रोल रुमला जोडला जातो. यानंतर ज्या जिल्हयातून बालक  मदत मागतो आहे, त्या जिल्हयाला तुरंत जोडला जातो. यानंतर संबंधित जिल्ह्यातील चाईल्ड हेल्पलाईनचे कर्मचारी बालकापर्यंत 30 मिनिटाच्या आत पोहोचतात व त्या बालकाला प्रथमत: सुरक्षित ठिकाणी  हलवले जाते. बालकांचे पुर्नवसन होईपर्यंत बालकल्याण समिती बालकासोबत कार्य करत असते.

जिल्हा महिला व  बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांच्या मार्गदर्शनात जिल्हयात जिल्हा चाईल्ड   हेल्पलाईन आणि रेल्वे चाईल्ड हेल्पलाईन बालकांसाठी मोफत सेवा दिली जात आहे. वरीलप्रमाणे काळजी आणि संरक्षणाची गरज असणारी बालके आढळल्यास 1098 या ‍ जिल्हा चाईल्ड  हेल्पलाईन च्या टोल फ्री  क्रमांकावर फोन करून माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने केले आहे.

००००००

मार्जिन मनी योजनेकरीता प्रस्ताव आमंत्रित

 मार्जिन मनी योजनेकरीता प्रस्ताव आमंत्रित

चंद्रपूरदि. 1 : केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसुचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरीता मार्जिन मनी योजना सुरू करण्यात आली आहे. सदर योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णय  क्रमांक स्टॅाडई-२०२०/प्र.क्र.२३ /अजाकदि. 9.12.2020 अन्वये शासन स्तरावरुन निश्चित करण्यात आलेल्या आहे. सदरचा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे.

            सदर योजनेकरीता इच्छुक लाभार्थ्यांनी सहाय्यक आयुक्तसमाज कल्याणचंद्रपूर यांचे कडे शासन निर्णयातील नमुद करण्यात आलेल्या  सर्व अटी व शर्तीची पुर्तता करुन प्रस्ताव सादर करावेतअसे आवाहन सहाय्यक आयुक्तसमाज कल्याणचंद्रपूर यांनी केले आहे.

००००००