Search This Blog

Monday 1 July 2024

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अप्रेंटिस भरती मेळावा



शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अप्रेंटिस भरती मेळावा

चंद्रपूरदि. 1 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर आणि मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने अप्रेंटीस भरती मेळावा नुकताच घेण्यात आला. यावेळी  अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य आर. बी. वानखेडे तर प्रमुख अतिथी म्हणून बीटीआरआय विभागाच्या सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार प्रणाली दहाटे व प्रमुख मार्गदर्शक म्हणून संभाजीनगर येथील इगल हायटेक कंपनीचे सुनील राठोडनागपूर येथील वैभव एन्टरप्राईजेसचे पराग कपाळेजय महाराष्ट्र कंपनीचे श्री. नडेराईट वॉक फाउंडेशनचे प्रतिनिधी कपिल बांबोळे  आदी उपस्थित होते.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थांना अप्रेंटीशीपच्या माध्यमातून कंपनीत काम करण्याची संधी मिळत असते. या संधीचा विद्यार्थ्यांनी अवश्य लाभ घ्यावाअसे आवाहन प्राचार्य आर.बी. वानखेडे यांनी केले तर बीटीआरआय विभागासंबंधित महत्त्वाची माहिती प्रणाली दहाटे यांनी दिली.

प्रास्ताविक बंडोपंत बोढेकर यांनी केले. संचालन अर्पिता घाघरगुंडे यांनी केले तर आभार श्री. दोरखंडे यांनी मानले. यावेळी गटनिदेशक एन. एन. गेडकररासेयोचे कार्यक्रम अधिकारी बंडोपंत बोढेकरश्री. लेडांगे आदींची उपस्थिती होती.

००००००

No comments:

Post a Comment