Search This Blog

Monday 22 July 2024

‘मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजना’ जिल्ह्यात 1 लक्ष 23 हजार 936 अर्ज प्राप्त

 


‘मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजना’

जिल्ह्यात 1 लक्ष 23 हजार 936 अर्ज प्राप्त

Ø अर्ज स्वीकारण्यासाठी एकूण 3901 मदत केंद्र कार्यान्वित

चंद्रपूरदि. 22 : जिल्ह्यामध्ये ‘मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजने’ची प्रभावी अंमलबजावणी होत असून या योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी जिल्ह्यात एकूण 3901 मदत केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत. या केंद्राच्या माध्यमातून 20 जुलैपर्यंत 1 लक्ष 23 हजार 936 महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठीत्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणेतसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भुमिका मजबूत करण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिला / मुलींना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहे. अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे.

अशी आहे प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या : जिल्ह्यात आतापर्यंत ऑफलाइन पद्धतीने 58231 तर ऑनलाईन पद्धतीने 65705 असे एकूण 1 लक्ष 23 हजार 936 अर्ज प्राप्त झाले आहेत. यात जिल्ह्यातील 3 शहरी अंगणवाडी आणि 15 ग्रामीण अंगणवाडी प्रकल्पामध्ये ऑफलाईन 54728ऑनलाईन 63460 असे एकूण 1 लक्ष 18 हजार 188 अर्जचंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सुविधा केंद्रात ऑफलाईन 2652ऑनलाईन 1097 एकूण 3749 अर्जजिल्ह्यातील नगरपालिका / नगरपंचायत क्षेत्रात असलेल्या सुविधा केंद्रात ऑफलाईन 438ऑनलाईन 678 एकूण 1116 अर्ज तर जिल्ह्यातील विविध सेतू केंद्रामध्ये ऑफलाईन 413ऑनलाईन 470 एकूण 883 अर्ज प्राप्त झाले आहेत.

जिल्ह्यातील मदत केंद्राची संख्या : जिल्ह्यातील तीन शहरी व 15 ग्रामीण अंगणवाडी प्रकल्पामध्ये एकूण 2962 मदत केंद्र, ग्रामपंचायत स्तरावर 825 केंद्र, चंद्रपूर महानगर पालिका स्तरावर 36, नगरपालिका / नगर पंचायत स्तरावर 51 आणि सेतू केंद्रस्तरावर 27 असे एकूण 3901 मदत केंद्र आहे.

०००००००

No comments:

Post a Comment