Search This Blog

Tuesday 30 July 2024

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 1503 प्रकरणे यशस्वीपणे निकाली



राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 1503  प्रकरणे यशस्वीपणे निकाली

चंद्रपूर,दि. 30 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा एस. एस. भीष्म यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्हा न्यायालय व सर्व तालुक्यात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 1503 प्रकरणे यशस्वीरित्या निकाली काढण्यात आली.

या लोक अदालतीमध्ये एकूण 10804 प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे व 14343 दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 1071 न्यायालयीन प्रकरणे तर 432 दाखलपूर्व अशी एकूण 1503 प्रकरणे निकाली काढण्यात आली. प्रलंबित प्रकरणांमध्ये मोटार वाहन अपघात नुकसान भरपाईची 20 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून नुकसान भरपाई 1 कोटी 70 लक्ष रुपये वसुल करण्यात आले. कौटुंबिक वाद प्रकरणांपैकी 2 प्रकरणामध्ये पक्षकारांनी एकत्र राहण्याचा समजुतीने निर्णय घेतला. धनादेश प्रकरणांपैकी 139 प्रकरणे निकाली काढण्यात आली. कामगार न्यायालयातील  6 प्रकरणे निकाली काढण्यात आली.

चंद्रपूर जिल्ह्यातील  सर्व न्यायालयात लोक अदालत यशस्वी होण्यासाठी सर्व न्यायाधीशसर्व वकीलसर्व न्यायालयीन कर्मचारीपोलीस कर्मचारी यांनी सहकार्य केले, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी दिली. 

००००००

No comments:

Post a Comment