Search This Blog

Friday 5 July 2024

29 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान सर्वोच्च न्यायालयात विशेष लोक अदालत सप्ताह


 

29 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान सर्वोच्च न्यायालयात विशेष लोक अदालत सप्ताह

चंद्रपूरदि. 5 : सर्वोच्च न्यायालयनवी दिल्ली येथे दिनांक 29 जुलै ते 3 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये विशेष लोक अदालत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर लोक अदालतीमध्ये सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवले जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ज्या पक्षकारांची  प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यास व ती तडजोडीने मिटावी,  अशी ज्यांची इच्छा असेल ती प्रकरणे विशेष लोक अदालतीमध्ये  ठेवता येऊ शकते. उपरोक्त लोक अदालतीमध्ये पक्षकार प्रत्यक्ष किंवा आभासी पद्धतीने सहभाग घेवू शकतात.

विशेष लोक अदालतीचे फायदे  : साध्या व सोप्या पद्धतीने वाद मिटवता येतो. झालेल्या तडजोडीचा निवाडा अंतिम व अंमलबजावणी होऊ शकणार असतो. वेळेची व पैशाची बचत होते. तडजोड झाल्यास न्यायालयीन शुल्क परत मिळते.

            जिल्हयातील प्रकरणे सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष लोक अदालतीमध्ये ठेवण्यासाठी संबंधित वकिलांना कल्पना द्यावी किंवा अधिक माहिती हवी असल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचंद्रपूर किंवा संबंधित तालुका विधी सेवा समिती यांच्याकडे संपर्क साधावाअसे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा समृध्दी भीष्म यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment