Search This Blog

Wednesday 3 July 2024

सरळ व कौशल्य चाचणीद्वारे निवासी व अनिवासी प्रवेशाकरिता नाव नोंदणी


सरळ व कौशल्य चाचणीद्वारे निवासी व अनिवासी प्रवेशाकरिता नाव नोंदणी

             चंद्रपूरदि. 3 : महाराष्ट्रातून  जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावंत  खेळाडूंची निवड करून  त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयपूणे अंतर्गत राज्यात कोल्हापूरठाणेअमरावतीअकोलानाशिकनागपूरऔरंगाबादगडचिरोली अशा 9 ठिकाणी क्रीडा प्रबोधिनी कार्यरत आहेत. सन 2024-25 साठी शिवछत्रपती क्रीडापीठ अंतर्गत सदर 9 क्रीडा प्रबोधीनित सरळ प्रवेश 50 टक्के व कौशल्य चाचणी  50 टक्के प्रक्रीयेअंतर्गत निवासी व अनिवासी प्रवेश देण्यात येणार आहे.

            सन 2024-25 करीता विविध  क्रीडा प्रबोधनी मध्ये ज्युडोजिम्नॅस्टीक्सहॉकीशुटींगफुटबॉलजलतरण,  ॲथलेटिक्सकुस्तीबॅटमिंटनऑर्चरीहॅण्डबॉलटेबलटेनिसवेटलिफ्टींगट्रायथलॉनसायकलींगबॉक्सींग अशा 17 क्रीडा प्रकारांमध्ये नविन प्रवेश देण्यासाठी 19 वर्ष आतील उद्योमुख खेळाडूंची कौशल्य चाचणी, सरळसेवा प्रवेश प्रक्रीयेकरिता राज्य स्तरावर प्राविण्य किंवा राष्ट्रीय स्तरावर सहभाग असणे आवश्यक आहे.

            उपरोक्त कार्यक्रमानुसार जिल्हास्तरावर नाव नोंदणी करिता 5 जुलै 2024 रोजी आपली नावे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयचंद्रपूर येथे कार्यालयीन वेळेत नोंदणी करावी. (सोबत-खेळाडूंचे नावजिल्हाखेळप्रकारजन्मदिनांकवय व क्रीडा कामगिरी प्रमाणपत्र आणावे.) अधिक माहिती करिता क्रीडा मार्गदर्शक विजय डोबाळे,     ( मो. क्र. 9545858975 ) यांचेशी संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पूंड यांनी कळविले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment