Search This Blog

Monday 15 July 2024

विद्या निकेतन विद्यालयात कायदेविषयक शिबीर


 विद्या निकेतन विद्यालयात कायदेविषयक शिबीर

चंद्रपूरदि. 15 : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,  मुंबई यांच्या निर्देशानुसार किमान समान कार्यक्रमअंतर्गत जिल्हा विधीसेवा प्राधिकरणलायन्स क्लब व युगल यांच्या संयुक्त विद्यमाने विद्या निकेतन विद्यालया येथे  कायदेविषयक शिबीराचे आयोजन  करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री गोहकरलायन्स क्लब युगलचे अध्यक्ष रितेश सागलानी तसेच संस्थेचे विश्वस्त आणि विद्यार्थी उपस्थित होते.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत वेळेावेळी वेगवेगळया शाळा व महाविद्यालयामध्ये कायदेविषयक जनजागृती  व्हावी, म्हणून शिबीर आयोजित केले जातात. मुलांना त्यांच्या संदर्भातील  कायदेहक्कअधिकार व कर्तव्ये माहित असणे आवश्यक आहे. कार्यक्रमाचे मुख्य वक्ते 3 रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा बाल न्याय मंडळाचे प्रमुख  न्ययाधीश एस.ए. लाडसेयांनी बाल गुन्हेगारी संदर्भांत असलेला कायदा  बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा2015 बाबत सर्व मुलांना उदाहरणासह माहिती दिली. कार्यक्रमाचे दुसरे वक्ते 6 वे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एन.आर. गोरलेयांनी मुलांचे अधिकारशिक्षणाचा अधिकार तसेच बेटी बचाव बेटी पढाव या विषयांवर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाखा कर्वे यांनी तर आभार मुख्याध्यापिका राजश्री गोहकर यांनी मानले.

०००००००

No comments:

Post a Comment