Search This Blog

Friday, 12 July 2024

15 जुलै रोजी महिला लोकशाही दिन

 15 जुलै रोजी  महिला लोकशाही दिन

            चंद्रपूर, दि. 12 :  प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हा स्तरावर महिला लोकशाही दिन व चवथा सोमवार तालुकास्तरीय  महिला लोकशाही दिन आयोजन करण्याबाबतचे निर्देश असल्यामुळे 15 जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन सकाळी 11 वा. निवासी उपजिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्या दालनात करण्यात आले आहे.  

            सदर महिला लोकशाही दिनी न्याय प्रविष्ठ प्रकरणे, सेवाविषयक, आस्थापने विषयक बाबी, व विहीत अर्जात नसलेली प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत. तरी ज्या महिलांचे वरील बाबी सोडून तक्रार /निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे असतील अशा तक्रारी महिला लोकशाही दिनाच्या 15 दिवसांपुर्वी जिल्हा  महिला व बाल विकास अधिकारी, चंद्रपूर यांचे कार्यालयात दोन प्रतीत अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. जिल्हास्तरिय महिला  लोकशाही दिनास प्राप्त तक्रार अर्जाचा निपटारा करण्यासाठी संबंधित विभागाला पाठवून प्राप्त तक्रार अर्जाचा निपटारा करण्यात येईल, तसेच विहीत अर्जाचा नमुना मिळविण्यासाठी कार्यालयाला भेट द्यावी, असे कळविण्यात आले आहे.

   ००००००


No comments:

Post a Comment