Search This Blog

Friday 5 July 2024

गोंड गोवारी समाजाचे लेखी निवेदने 15 व 16 जुलै रोजी सादर करण्याचे आवाहन

 गोंड गोवारी समाजाचे लेखी निवेदने 15 व 16 जुलै रोजी सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूरदि.5 : महाराष्ट्रातील गोंड गोवारी समाजाच्या निवेदनावर अभ्यास करण्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्ती न्यायाधीश के.एल. वडणे यांचे अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. गोंड गोवारी समाजाच्या संबंधित संघटनेचे प्रतिनिधी हे समितीसमोर आपले संक्षिप्त लेखी निवेदन सादर करू शकतील. निवेदन हे टंकलिखीत व वाचनीय असणे आवश्यक आहे. तसेच संघटनेतील प्रतिनिधीला थोडक्यात आपले म्हणने मांडण्यासाठी संधी देण्यात  येईल.

दिनांक 15 व 16 जुलै 2024 रोजी  रविभवन शासकीय विश्रामगृहनागपूर येथे सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत तर 18 ते 20 जुलै 2024 रोजी शासकीय विश्रामगृहअमरावती येथे गोंड गोवारी समाज बांधव /प्रतिनिधी/संस्था यांनी सदर दिनांकास उपस्थित राहून निवेदने सादर करावी, असे आवाहन आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त यांनी केल्याचे सहआयुक्त तथा अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे उपाध्यक्ष विनोद पाटील यांनी कळविले आहे.     

००००००

No comments:

Post a Comment