Search This Blog

Friday 19 July 2024

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातून 305 उमेदवारांची प्राथमिक निवड


पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातून 305 उमेदवारांची प्राथमिक निवड

चंद्रपूरदि.19 :  जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रचंद्रपूर, मॉडल करिअर सेंटर आणि गोंडपिपरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जागतिक युवा कौशल्य  विकास दिनानिमित्त घेण्यात आलेल्या पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 305 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त भैयाजी येरमे तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार शुभम बहाकर यांच्यासह बॅक ऑफ इंडीयाचे प्रतिनिधी विनय नवखरे, मनिष वाळकेडॉ. बोरकुटे, श्याम कुंदोजवार व इतर अधिकारी उपस्थित होते.

या रोजगार मेळाव्यात 1) संसूर सृष्टी इंडिया प्रा.लि. चंद्रपूर2) विदर्भ क्लिक वन सोल्यूशनचंद्रपूर 3) एस.बी.आय.लाईफ इंन्शूरन्स चंद्रपूर,  4) आदित्य इंजिनीअरींग कोनसरी स्टील प्लॅन्ट5) यहोवा यिरे फाऊंडेशन 6) स्टॉप कॅन्सर मिशन 7) एल.आय.सी. ऑफ इंडिया 8) अंश इंजिनिअरींग  9) एच.डी.एफ.सी. बॅक लिमिटेड 10) मानव इलेक्ट्रिकल गोंडपिपरी व इतर नामवंत कंपन्या उपस्थित होत्या. या रोजगार मेळाव्यात 650 उमेदवारांची नोंदणी झाली त्यापैकी एकूण 305 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली

            कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य नरेंद्र किलनाके म्हणाले, बेरोजगार उमेदवारांनी मोठ्या शहराकडे वळून अधिकाअधिक कौशल्य प्राप्त करावे. आपल्या कुटुंबाची उपजिवीका करावी तसेच मोठे उद्योजक बनावे, असे सांगितले. भैयाजी येरमे यांनी, जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ द्यावा तसेच आपल्या कौशल्याचा वापर रोजगार व/स्वंयरोजगार मिळविण्यासाठी करावा, असे मार्गदर्शन केले.  तहसीलदार शुभम बहाकर यांनी रोजगार मेळाव्यातून जास्तीत जास्त उमेदवारांनी नोकरी प्राप्त करावी आणि कंपन्यामध्ये मिळेल ते काम करावे.  त्यातून अनुभव घेऊन उद्योजक बनावे, असे सांगितले. 

कार्यक्रमाचे आभार श्री. मद्देलवार यांनी मानले. यावेळी योगेश काळेश्रवन कुमारश्रीकांत किरणाके व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.

००००००

No comments:

Post a Comment