Search This Blog

Monday 22 July 2024

अनुसूचित जमातीच्या मुला मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती


अनुसूचित जमातीच्या मुला मुलींना परदेशात  शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

Ø चिमूर प्रकल्प कार्यालयाचे अर्ज करण्याचे आवाहन

            चंद्रपूरदि. 22 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचिमुर या कार्यालयाच्या अतंर्गत  चिमुर,    ब्रम्हपरीनागभीडवरोरा व भद्रावती या तालुक्यांचा समावेश होतो. आदिवासी विकास विभागाकडून राज्यातील अनुसुचित जमातीच्या आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर  पदविकापदव्युत्तर पदवी आणि पीएचडी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यासाठी 7 मार्च 2024 च्या शासन निर्णयान्वये कुटुंबाचे वार्षिक उत्पनांची कमाल मर्यादा 8 लक्ष रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी क्युएस वर्ल्ड रॅकींग 200 च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतील, अशा विद्यार्थ्यांना प्रतीवर्षी परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येईल.

त्यानुसार परदेशात शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या इच्छुक अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी शासन निर्णयाच्या शर्ती व अटीच्या अधिन राहून अर्ज करावा. अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारीएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचिमुर या कार्यालयाशी संपर्क साधावाअसे प्रकल्प अधिकारी प्रविण लाटकर यांनी कळविले आहे.

                                                                                ००००००

No comments:

Post a Comment