Search This Blog

Tuesday 2 July 2024

आरटीओ कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती


आरटीओ कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती

              चंद्रपूरदि. : वाहन मालकांना व चालकांना वाहतुकीच्या नियमांची माहिती व्हावी व रस्त्यावरील    वाढते अपघात कमी होण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयचंद्रपूर तर्फे गांधी चौक, मुल येथे रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती करण्यात आली.

उपस्थित वाहन चालकांना वेग मर्यादेपेक्षा अतिवेगाने वाहन चालविल्यास व विना हेल्मेट गाडी चालविण्याऱ्या वाहनावरती इंटरसेप्टर वाहनाच्या कॅमेराद्वारे ऑनलाईन व ई -चालन तयार करण्यात येत असून सर्व नागरिकांनी याची दखल घ्यावी व वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले. तसेच गाडी चालवत असताना हेल्मेट म्हणजे आयुष्याचा झकास आधार याबद्दल प्रादेशिक परिवहन कार्यालचंद्रपूरच्या वतीने सहा. मोटार वाहन निरिक्षक वैभव डुब्बेवार यांनी मार्गदर्शन केले.

            यावेळी कार्यालयाच्या वतीने वाहतूक नियमांचे व चिन्हांचे माहिती पत्रके वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास मुल पोलिस स्टेशनचे श्रीराम उत्तरवार व इतर कर्मचारी उपस्थित होते.

००००००

No comments:

Post a Comment