Search This Blog

Thursday 4 July 2024

सन 2024-25 करीता आदिवासी मुला-मुलींचे वसतिगृहात प्रवेश

 सन 2024-25 करीता आदिवासी मुला-मुलींचे वसतिगृहात प्रवेश

            चंद्रपूरदि.4 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,  चंद्रपूर अंतर्गत असलेल्या आदिवासी मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहामध्ये सन 2024-25  करीता प्रवेश घेण्यासाठी फक्त अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

प्रि-मॅट्रीककनिष्ठ महाविद्यालयपदवीपदविका (डिप्लोमा)पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 31 जुलै 2024 पर्यंत अर्ज करता येतील. तसेच मेडिकल व इंजिनिअरींग विद्यार्थ्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येतील. खास बाब अंतर्गत प्रवेशाबाबतच्या लोक प्रतिनिधींच्या शिफारसी दिनांक 25 ऑगस्ट 2024 पर्यंतच या कार्यालयात सादर करता येतील.  यानंतर आलेल्या शिफारसींचा ‍विचार केला जाणार नाही, याची प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी दखल घ्यावीअसे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment