Search This Blog

Friday 5 July 2024

15 जुलै रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

 15 जुलै रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

चंद्रपूरदि. 5 : जिल्हा कौशल्य  विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडल करीअर सेंटर आणि शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थागोंडपिपरी यांच्या तर्फे दिनांक 15 जूलै 2024 रोजी सकाळी 11 पंडित दिनदयाळ  उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थागोंडपिपरी येथे करण्यात आले आहे.

जिल्हातील 10 वी, 12 वी, आय.टी.आयपदविकापदवी इत्यादि बेरोजगार  उमेदवारांना विविध  क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध  करून देण्याच्या दृष्टीने  राज्यातील नामांकित उद्योजकांचा थेट नोकरी इच्छुक उमेदवारांशी संपर्क करून देण्यात येणार आहे. सदर रोजगार मेळाव्यातून 800 पेक्षा जास्त पदे भरण्यात येणार असून मेळाव्यामध्ये विविध नामांकित कंपन्या सहभागी होत आहे. या मेळाव्यातून चंद्रपूरपुणे येथे रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे. यामध्ये स्पंदना स्फुर्ती  फायनन्स प्र. लिमीटेडचंद्रपूर, लोन ऑफीसर मॅन, जय महाराष्ट्र प्लेसमेंट सर्विसेसविदर्भ क्लिक 1 सोल्युशन, एलआयसी ऑफ इंडिया- इन्सुरन्स ॲडवायझरनवभारत फर्टिलायझर,औरंगाबाद, सेल्स रिप्रेझेन्टीटीव्ह इ. प्रकारच्या कंपन्यात विविध पदे असल्याचे उद्योजकाकडून कळविण्यात आले आहे.

मेळाव्याकरीता उमेदवारांनी आधारकार्ड व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्राचे झेरॉक्स प्रतीसह (कमीत कमी तीन प्रती) उपस्थित राहावे. मेळाव्यामध्ये सहभागी होण्याकरीता https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाइटवर नोंदणी करावी व ऑनलाईन अप्लाय सुध्दा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

मेळाव्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. अधिक माहिती करीता जिल्हा कौशल्य  विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रचंद्रपूर दुरध्वनी क्रमांक 07172 -252295 येथे संपर्क करावा. सदर मेळाव्यामध्ये जिल्हातील जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी सहभागी होण्याचे व मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य  विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भै.गो. येरमे यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment