Search This Blog

Thursday, 5 December 2024

जिल्हा माहिती कार्यालय येथील वृत्तपत्राच्या रद्दी विक्रीसाठी निविदा सादर करण्याचे आवाहन

 जिल्हा माहिती कार्यालय येथील वृत्तपत्राच्या रद्दी विक्रीसाठी निविदा सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 5 : जिल्हा माहिती अधिकारी, चंद्रपूर यांचे कार्यालयरुम नं 20, पहिला माळाप्रशासकीय भवनयेथील दैनिक व साप्ताहिक वृत्तपत्राची रद्दी विकावयाची आहे. त्यासाठी स्थानिक दुकानदारांकडून खरेदीबाबतचे दरपत्रक (निविदा) जिल्हा माहिती अधिकारी यांच्या कार्यालयात सिलबंद पाकिटात दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत पोहोचतील, या बेताने पाठवावीत. पाकिटावर रद्दी विक्रीसाठी दरपत्रक असे ठळक अक्षरात नमुद करावे.

प्राप्त झालेले दरपत्रक (निविदा ) त्याच दिवशी दुपारी 3.00 वाजता उघडण्यात येईल. निविदा उघडतांना आपण स्वत: किंवा आपला प्रतिनिधी उपस्थित राहू शकेल. रद्दी विकण्याबाबतचे दरपत्रक (निविदा) मंजूर करण्याचे अथवा रद्द करण्याचे संपूर्ण अधिकार जिल्हा माहिती अधिकारीचंद्रपूर यांनी राखून ठेवले आहेत. रद्दी विक्री कार्यालयीन वेळेत सकाळी 11 ते सायंकाळी वाजेपर्यंत जिल्हा माहिती अधिकारी यांचे कार्यालयरुम नं 20, पहिला माळाप्रशासकीय भवनचंद्रपूर येथे संबंधितांना पाहता येईल.

००००००

‘त्या’ प्लॉटधारकांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे कागदपत्र जमा करण्याचे आवाहन

 ‘त्या’ प्लॉटधारकांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे कागदपत्र जमा करण्याचे आवाहन

Ø ताडोबा येथे कुटीचे बांधकाम न करता आर्थिक फसवणूक केल्याचे प्रकरण

चंद्रपूर, दि. 5 : ताडोबा व्याघ्र प्रकल्पात येणा-या पर्यटकांसाठी रिसोर्ट प्रमाणे कुटी किरायाने देऊन प्रतिमाह आर्थिक उत्पन्न मिळवून देण्याचे प्रलोभन दिल्याप्रकरणी तसेच कुटीचे बांधकाम न करता 41 लक्ष 50 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी भार्गवी लॅन्ड ॲन्ड डेव्हलपर्सचा मालक भरत नानाजी धोटेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरत धोटे याने मौजा किटाळी येथील डॉ. अमोल सतिश पोद्दार यांच्या ले-आऊटवर तसेच चांदा रयतवारी येथील ले-आऊट वरील गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याने संबंधित प्लॉटधारकांनी या संदर्भातील कागदपत्रे आर्थिक गुन्हे शाखेकडे जमा करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

आरोपी भरत नानाजी धोटे (वय 38) रा. तुकूम, चंद्रपूर याने भार्गवी लॅन्ड ॲन्ड डेव्हलपर्स या नावाने खाजगी कंपनी स्थापन करून अभिकर्ते नियुक्त केले. त्यांच्या माध्यमातून मौजा पद्मापूर, अजयपूर, तळोधी (तुकूम), बोर्डा, किटाळी येथे कुट्यांचे बांधकाम करून सदर कुटी युनिव्हर्स ॲग्रो टूरिझम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी करारनामा करण्याचे आमिष दाखविले. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात येणा-या पर्यटकांसाठी रिसोर्टप्रमाणे कुटी किरायाने देऊन प्रतिमाह 7083 रुपये देण्याचे प्रलोभन दाखवून प्रत्येक गुंतवणूकदारांकडून 2 लक्ष 50 हजार रुपये याप्रमाणे एकूण 41 लक्ष 50 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सर्व पिडीत अन्यायग्रस्तांतर्फे अशोक पांडूरंग भटवलकर, रा. म्हाडा कॉलनी, दाताळा यांच्या लेखी रिपोर्टवरून 19 डिसेंबर 2022 रोजी भरत धोटेविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्ह्याचा तपास चंद्रपूर आर्थिक गुन्हे शाखा करीत असून या तपासात आरोपी भरत नानाजी धोटे याने भार्गवी लॅन्ड ॲन्ड डेव्हलपर्स या नावाने खाजगी कंपनी स्थापन करून मौजा किटाळी येथील डॉ. अमोल सतीश पोद्दार यांचे सर्व्हे क्रमांक 76/3 आणि 76/4 तसेच मौजा चांदा रयतवारी भुमापन क्रमांक 415/1 व 416 येथे सुध्दा ले-आऊट तयार करून प्लॉटच्या विक्रीकरीता सदर ग्राहकांसोबत 100 रुपयांच्या स्टँप पेपरवर विसारपत्र केल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यामुळे संबंधित ले-आऊटमधील प्लॉट घेण्याकरीता विसारपत्र करणा-या लोकांनी त्यांच्याजवळ असलेले संबंधित प्लॉटचे विसारपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे बातमी प्रकाशित झाल्यापासून 8 दिवसांच्या आत आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथे जमा करावे, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर चिकनकर यांनी केले आहे.

००००००

Wednesday, 4 December 2024

अनोळखी मृत्यकाची ओळख पटविण्याकरीता संपर्क करण्याचे आवाहन

 अनोळखी मृत्यकाची ओळख पटविण्याकरीता संपर्क करण्याचे आवाहन    

चंद्रपूरदि.  4  : 23 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 5 वाजताच्या दरम्यान अनोळखी पुरुष, अंदाजे वय 40 वर्ष हा  छोटी पडोली  रेल्वे स्टेशन ते विवेकांनद नगर रेल्वे स्टेशनच्या मध्ये अनेाळखी पुरुषाचे प्रत आढळले, अशी माहिती स्टेशन मास्टर प्रमोद शहाणे यांनी दिली. यावरुन पोलिस स्टेशन पडोली येथे  मर्ग दाखन करण्यात आलेला आहे. सदर अनोळखी पुरुषाची आजपावेतो ओळख पटलेली नसून नावपत्ता किंवा नातेवाईकाबाबत माहिती मिळालेली नाही. सदर मृतक अनोळखी इसमाची ओळख पटविणे आवश्यक आहे. 

मृतकाचे वर्णन : अनोळखी पुरुष, वय -अंदाजे 40 वर्षरंग -सावळाबांधा - मजबुत उंची – 5 फुट 3 इंच, अंगात फीकट आकाशी रंगाची टी शर्ट ,काळया रंगाचा  बरमुडाचेहरा गोलदाडी - मिशी व डोक्याचे केस काळे. सदर अनोळखी मृतकाबाबत कोणालाही माहिती असल्यास संपर्क करण्याचे आवाहन पडोली पोलिसांनी केले आहे.

०००००

हरविलेल्या व्यक्तिबद्दल संपर्क करण्याचे आवाहन

 हरविलेल्या व्यक्तिबद्दल संपर्क करण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 4 : शहरातील विठ्ठल मंदीर वार्ड येथील रहिवासी चंद्रकांत उर्फे पप्पु वामनराव मानमोडे (वय 35 वर्षे)  हा 23 सप्टेंबर 2024 रोजी काही न सांगता आपले घरून सकाळी 5 वाजता निघून गेला. सदर इसम आजपावेतो घरी परत न आल्याने त्याचा मारडीजळगावआर्वी येथे नातेवाईकाकडे फोनद्वारे विचारणा केली असता तो गावाकडे आला नाही, अशी माहिती मिळाली. तसेच चंद्रपूर शहरात रेल्वे स्टेशन, बसस्थानकगांधी चौकजटपुरा गेटमहाकाली मंदीर परीसरात, इतर वार्डात व मित्रांकडेसुध्दा शोध घेतला असता मिळून न आल्याने चंद्रकांतच्या आईच्या तक्रारीवरून पोलिस स्टेशनला नोंद घेऊन त्याचा शोध घेणे सुरू आहे. सदर व्यक्ति कोणालाही आढळल्यास शहर पोलिस स्टेशनला संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हरविलेल्या व्यक्तिचे वर्णन :  बांधा – मजबूत,   उंची – 5 फुट  6 इंचरंग -गोराकेस -काळेडोळे -टपोरेचेहरा -गोलनाक -सरळअंगात टी शर्ट, क्रिम रंगाचा काळया रंगाचा जिन्स पॅन्ट  घातलेला असून उजव्या खांदयावर गोंदन आहे.

दुस-या प्रकरणात शहरातील समाधी वॉर्ड येथील रहिवासी लक्ष्मी सागर पवार (वय 19) ही 27 नोव्हेंबर 2024 रोजी कोणाला  काही न सांगता परस्पर घरून निघुन गेली आहे. वार्डात व नातेवाईक यांच्याकडे  विचारपुस केली असता तिचा शोध लागला नाही. तसेच चंद्रपूर शहर, जटपुरा गेटगांधी चौक,  रेल्वे स्टेशनबसस्थानकमुख्य रेल्वे स्टेशनरामाळा तलाव येथे  शोध घेतला असता पत्नी मिळून न आल्याने तिचे पती सागर शिवाजी पवार यांच्या तक्रारीवरून शहर पोलिस स्टेशनला मिसींग रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. सदर व्यक्ती आढळून आल्यास त्वरीत संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.  

हरविलेल्या व्यक्तीचे वर्णन :  बांधा- सळपातळ,   उंची -  4 फुट  5इंचरंग -सावळाकेस -काळे बॉबकटडोळे -टपोरे काळे,   चेहरा -गोलअंगात पिंक रंगाचा नाईट ड्रेसअंगात सोन्याचे मंगळसुत्रउजव्या हाताच्या मध्यमा बोटामध्ये सोन्याची अंगठी व कंरगळी मध्ये चांदीची अंगठी  आहे. पायात पैजन तिला मराठी कन्नडहिन्दीइंग्रजी अशा भाषा बोलता येतात.

००००००

शबरी आदिवासी घरकुल योजनेची आता शहरी भागात देखील अंमलबजावणी

 शबरी आदिवासी घरकुल योजनेची आता शहरी भागात देखील अंमलबजावणी

चंद्रपूर, दि. 4 : आदिवासी उपयोजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घरे नाहीत, अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक कुडा-मातीच्या घरातझोपडयांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवाऱ्यांत राहतात, अशा अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागाप्रमाणेच आता शहरी भागातसुध्दा या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

शासन निर्णयानुसार शबरी आदिवासी घरकूल योजना ही ग्रामीण व शहरी या दोन्ही भागात राबविणे अपेक्षित होते. ग्रामविकास विभागाच्या 10 फेब्रुवारी 2016 च्या शासन निर्णयान्वये राज्यातील ग्रामीण गृहनिर्माण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व सनियंत्रण करण्यासाठी राज्य व्यवस्थापन कक्ष- इंदिरा आवास योजना कक्षाचे रुपांतर राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कक्षामध्ये करण्यात आले आहे. त्यानुषंगाने या कक्षाद्वारे ग्रामविकास विभागसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागआदिवासी विकास विभाग व राज्य शासनाच्या विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व ग्रामीण घरकूल कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शबरी आदिवासी घरकूल योजनेची अंमलबजावणी ही या कक्षाद्वारे करण्यात येत आहे.

परंतु शहरी भागात शबरी आदिवासी घरकूल योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी अंमलबजावणी यंत्रणा नसल्याने शहरी भागात शबरी आदिवासी घरकूल योजनेची अंमलबजावणी ही संबंधित महानगरपालिका / नगरपालिका / नगरपंचायत यांचेमार्फत करण्यासाठी नगरविकास विभागास आदिवासी विकास विभागाद्वारा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. आदिवासी विकास विभागाच्या प्रस्तावास नगरविकास विभागाने सहमती दर्शविली असून मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. राज्यातील शहरी भागातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घरे नाहीत अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक कुडा-मातीच्या घरातझोपडयांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवाऱ्यांत राहतात, अशा अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांना शबरी आदिवासी घरकूल योजनेचा लाभ देण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे. जातीय दगंलीमध्ये घराचे नुकसान झालेली व्यक्तीअॅट्रोसिटी अॅक्टनुसार पिडित व्यक्तीविधवा किंवा परित्यक्त्या महिलाआदिम जमातीची व्यक्ती यांना निवड प्रक्रियेमध्ये प्राधान्य देण्यात येईल.

      शासन निर्णय 10 ऑक्टोबर 2024 अन्वये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्राकरिता 350बल्लारपूर नगर परिषद क्षेत्राकरिता 200मूल नगर परिषद क्षेत्राकरिता 200 तर पोंभूर्णा नगर पंचायत क्षेत्राकरिता 100 असा एकूण 850 शहरी घरकुलांचा लक्षांक चंद्रपूर जिल्ह्याकरिता प्राप्त आहे. पात्र व गरजू आदिवासी बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने अर्ज सादर करून शबरी शहरी घरकुल योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले आहे.

 लाभार्थी पात्रता : 1) लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा. 2) स्वतःच्या नावाने पक्के घर नसावे. 3) महाराष्ट्र राज्यातील 15 वर्षापासून रहिवासी असावा. 4) घराचे बांधकाम करण्यासाठी स्वतःची किंवा शासनाने दिलेली जमीन असावी. 5) यापूर्वी कोणत्याही शासकीय घरकूल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. 6) वय वर्षे 18 पूर्ण असावे. 7) स्वतःच्या नावाने बैंक खाते असावे. 8) घरकुलाच्या बांधकामासाठी किमान 269.00 चौरस फुट जागा उपलब्ध असावी. 9) वार्षिक उत्पन्न मर्यादा रूपये 3.00 लाख पर्यंत असावी.

 आवश्यक कागदपत्रे : 1) अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो 2) रहिवासी प्रमाणपत्र (15 वर्षापासून रहिवासी असणे आवश्यक) 3) अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र (कास्ट सर्टिफिकेट) 4) घरकूल बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे किंवा नाही यासाठी पुरावा. 5) उत्पन्नाचा दाखला (तहसिलदार यांचा) 6) शिधापत्रिका (रेशन कार्ड) 7) आधार कार्ड 8) एक रद्द केलेला धनादेश (कँसल्ड चेक) अथवा बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत (फोटो व खाते क्रमांक, IFSC कोड स्पष्ट दिसत असलेले) 9) गावठाण क्षेत्रातील ज्या लाभार्थ्यांकडे जमिनीची मालकी नाही अशा लाभार्थ्यांनी मागील 3 वर्षाच्या मालमत्ता कर पावती सादर करावी. सोबत कर मुल्यांकन प्रत सादर करावी.

 अर्ज करावयाची पद्धत : विहित अर्ज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूरमहानगर पालिका चंद्रपूर व संबंधित नगर परिषद / नगर पंचायत येथे नि:शुल्क उपलब्ध आहे. अर्ज आवश्यक सर्व कागदपत्रांसह वरील कार्यालयात सादर करावा व त्याची पोच घ्यावी.

 अनुदान रक्कम : घरकुल बांधकामासाठी अनुदान रक्कम ही रूपये 2.50 लाख एवढी राहील. सदर अनुदान रक्कम ही खालील प्रमाणे 4 टप्प्यांत लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बॅक खात्यात जमा करण्यात येईल.

1) घरकुल मंजूरी 40 हजार रुपये, 2) प्लिंथ लेव्हल 80 हजार रुपये, 3) लिंटल लेव्हल 80 हजार रुपये आणि 4) घरकुल पूर्ण 50 हजार रुपये

०००००००