जिल्हा माहिती कार्यालय येथील वृत्तपत्राच्या रद्दी विक्रीसाठी निविदा सादर करण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 5 : जिल्हा माहिती अधिकारी, चंद्रपूर यांचे कार्यालय, रुम नं 20, पहिला माळा, प्रशासकीय भवन, येथील दैनिक व साप्ताहिक वृत्तपत्राची रद्दी विकावयाची आहे. त्यासाठी स्थानिक दुकानदारांकडून खरेदीबाबतचे दरपत्रक (निविदा) जिल्हा माहिती अधिकारी यांच्या कार्यालयात सिलबंद पाकिटात दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत पोहोचतील, या बेताने पाठवावीत. पाकिटावर रद्दी विक्रीसाठी दरपत्रक असे ठळक अक्षरात नमुद करावे.
प्राप्त झालेले दरपत्रक (निविदा ) त्याच दिवशी दुपारी 3.00 वाजता उघडण्यात येईल. निविदा उघडतांना आपण स्वत: किंवा आपला प्रतिनिधी उपस्थित राहू शकेल. रद्दी विकण्याबाबतचे दरपत्रक (निविदा) मंजूर करण्याचे अथवा रद्द करण्याचे संपूर्ण अधिकार जिल्हा माहिती अधिकारी, चंद्रपूर यांनी राखून ठेवले आहेत. रद्दी विक्री कार्यालयीन वेळेत सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा माहिती अधिकारी यांचे कार्यालय, रुम नं 20, पहिला माळा, प्रशासकीय भवन, चंद्रपूर येथे संबंधितांना पाहता येईल.
००००००
No comments:
Post a Comment