मृत महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 24: महाकाली मंदीर परिसरात एक अनोळखी वयोवृद्ध महिला झोपलेल्या अवस्थेत आढळून आली. सदर महिलेस सामान्य रुग्णालय,चंद्रपूर येथे उपचाराकरीता भरती केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषीत केले. सदर महिलेच्या नातेवाईकाचा शोध घेतला असता उपयुक्त माहिती मिळून आली नसल्याने मृत महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमार्फत करण्यात येत आहे.
अनोळखी मृत महिलेचे वर्णन पुढीलप्रमाणे :
वय अंदाजे 70 वर्ष, उंची 5 फुट, रंग काळा-सावळा, गोल चेहरा, नाक सरळ, केस काळे पांढरे गुंतलेले, उजव्या हातावर शांताबाई नाव गोदलेले, अगांत निळ्या रंगाचा स्वेटर ज्यावर पाढंऱ्या रंगाचे पट्यांची डिझाईन असलेले व त्या खाली कथ्या रंगाचा गावून त्यावर पाढंऱ्या हिरव्या रंगाचे डिझाईन असलेले परीधान केलेला आहे. या वर्णनावरून सदर मृतक अनोळखी महिलेला कोणी ओळखत असल्यास चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे तपासी अमंलदार 9923401065 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
00000
No comments:
Post a Comment