नायलॉन मांजाची विक्री व साठवणूक करणाऱ्यांवर सक्त कारवाई करा
- जिल्हाधिकारी विनय गौडा
चंद्रपूर, दि.31: मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर महिन्यापासूनच पतंगबाजी सुरू झाली आहे. पतंग उडविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉन मांजामुळे पशू-पक्षींना इजा, मानवहानी तसेच मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. नायलॉन मांजामुळे होणाऱ्या जीवितहानीकडे सर्रास दुर्लक्ष करत नागरिक मांजाचा वापर करतात. त्यामुळे येणारे सण बघता मांजाच्या प्रतिबंधाबाबत टीम तयार करा. जिल्ह्यामध्ये मांजाची विक्री, वापर व साठवणूक करणाऱ्यांवर नियमानुसार सक्त कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात नायलॉन मांजाच्या प्रतिबंधाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त विपिन पालीवाल, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) निशिकांत रामटेके, जिल्हा आरोग्य अधिकारी अशोक कटारे, पोलीस निरीक्षक लता वाडिवे आदींची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, नायलॉन मांजाच्या प्रतिबंधासंदर्भात कोर्टाने कारवाई करण्याचे निर्देश पूर्वीपासूनच दिलेले आहे. पोलीस विभाग व स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे मांजा विक्रेते, साठा वितरण करणाऱ्या दुकानदारांवर धाडसत्र मोहीम राबवून साठा जप्त करावा. तालुकास्तरावर उपविभागीय अधिकाऱ्यांनी तातडीने टीम नेमावी. सदर टिमने दुकान व बाजारात जाऊन मांजा विक्री होत असल्याबाबत तपासणी करावी. त्यासोबतच, नायलॉन मांजाच्या दुष्परिणामाबाबत माहिती देवून लोकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती करावी. असे निर्देश देखील जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी बैठकीत दिले.
000000000
No comments:
Post a Comment