Search This Blog

Tuesday, 17 December 2024

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्ण संधी

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्ण संधी चंद्रपूर, दि. 17: भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्विस सिलेक्शन बोर्ड (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे नवयुवक-युवतींसाठी 30 डिसेंबर ते 08 जानेवारी 2025 या कालावधीत एस.एस.बी कोर्स क्र. 60 आयोजित करण्यात येत आहे. सदर कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे. जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, चंद्रपूर येथे दि. 23 डिसेंबर 2024 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतांना डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेअर, पुणे Department 0f Sainik Welfare, pune (DSW) यांची वेबसाईट www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन (Other-PCTC Nashik-SSB 60) कोर्ससाठी परिशिष्ट उपलब्ध करुन दिले जाईल. किंवा 9156073306 या व्हॉट्सॲप क्रमांकावर SSB-60 मॅसेज केल्यास कोर्ससाठी संबधित परिशिष्ट व्हॉट्सॲपद्वारे पाठवले जातील. प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली प्रिंट पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे. केंद्रात एस.एस.बी. कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी पात्रता: कम्बाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेली असावी. त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एन.सी.सी. C सर्टिफिकेट, A किंवा B ग्रेडमध्ये पास झालेले असावे. तसेच एन.सी.सी. ग्रुप हेडक्वार्टर्सने एस.एस.बी.साठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्सकरिता एस.एस.बी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. युनिव्हर्सिटी एन्रीेल स्किमसाठी एस.एस.बी कॉल लेटर किंवा एस.एस.बी.साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ई-मेल training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्रमांक 0253-2451032 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, यांनी केले आहे. 00000

No comments:

Post a Comment