Search This Blog

Thursday, 12 December 2024

अखिल भारतीय नागरी सेवा बास्केटबॉल स्पर्धा

 अखिल भारतीय नागरी सेवा बास्केटबॉल स्पर्धा

चंद्रपूर, दि. 12 : अखिल भारतीय नागरी सेवा बास्केटबॉल स्पर्धा 2024-25 3 जानेवारी२०२५ ते ८ जानेवारी 2025 या कालावधीत प्रितमपुरानवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या संघाची निवड चाचणी सोमवार 23 डिसेंबर 2024 रोजी कुपरेज बास्केटबॉल ग्रांऊडसचिवालय जिमखानाजवळमुंबई येथे सकाळी 8 वा. आयोजित करण्यात आली आहे.

विविध राज्य शासकीय कार्यालयात कार्यरत असलेल्या इच्छूक खेळाडूंनी प्रथम आपले आवेदनपत्र सचिवालय जिमखाना येथे 20 डिसेंबर 2024 पर्यंत sachivalaygym1954@gmail.com या संकेतस्थळावर सादर करावे. आवेदन पत्र सादर करणाऱ्या खेळाडूंना सदर निवड चाचणीसाठी उपस्थित राहण्याबाबत सचिवालय जिमखानामुंबई यांचेमार्फत कळविण्यात येईल. खेळाडूंनी आपल्या कार्यालय प्रमुखांच्या लेखी परवानगीसह आणि कार्यमुक्ती आदेशासह निवड चाचणीस उपस्थित रहावे. सदर स्पर्धेत सहभागी होण्याकरीता जिमखाना सभासद असण्याची आवश्यकता नाही.

खेळाडूंकरीता सूचना : 1) स्वतःचे शासकीय ओळखपत्र 2 झेरॉक्स प्रतिसह व कार्यमुक्ती आदेशाची मुळ प्रत निवड चाचणी अगोदर सादर करावी. 2) निवड चाचणीसाठी खेळाडूंनी आपले स्वतःचे किट (टी-शर्टशॉर्टस्शूज इ.) आणणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : सचिवालय जिमखानामुंबई दूरध्वनी क्रमांक 022- 35645356 किंवा मानत सचिव बास्केटबॉल संजय पोफळे (मो. 88503 58268), संजय कदम (मो. 90824 91675), प्रताप माडकर (मो. 97027 07088), सतीश सोनवाने (मो. 98692 36328) आणि मकरंद गयावळ (मो. 91375 41867) यांच्याशी संपर्क करावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी कळविले आहे.

०००००

No comments:

Post a Comment