Search This Blog

Thursday, 12 December 2024

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अंतरिम उत्तरसुची प्रसिध्द

 

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अंतरिम उत्तरसुची प्रसिध्द

Ø संकेतस्थळावर आक्षेप नोंदणीची मुदत 16 डिसेंबरपर्यंत

चंद्रपूरदि. 12 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्र.1 व पेपर क्र.2 ची अंतरिम तात्पुरती उत्तरसूची प्रसिध्द करण्यात येत आहे. या परीक्षेसाठी पेपर क्र. 1 व पेपर क्र.2 बाबत प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी किंवा आक्षेप असल्यास ते परिषदेकडे 16 डिसेंबर 2024 अखेरपर्यंत पाठवता येतील, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.

सदर आक्षेप किंवा त्रुटी बाबतचे निवेदन http://mahatet.in या संकेतस्थळावर परीक्षार्थ्यांच्या लॉगीन मध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आक्षेप नोंदणी या लिंकद्वारे परिषदेकडे पाठवता येतील. आक्षेपाबाबत लेखी निवेदन समक्ष, टपालाने किंवा ईमेलद्वारे पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही. विहित मुदतीत ऑनलाईन रित्या प्राप्त झालेल्या आक्षेपाचा विचार करून विषय तज्ञांच्या अभिप्रायानुसार अंतिम उत्तरसूची यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

००००००

No comments:

Post a Comment