तक्रार निवारण समितीकरीता सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रस्ताव आमंत्रित
चंद्रपूर, दि. 13 : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, 2013 नुसार चंद्रपूर जिल्ह्याकरीता स्थानिक तक्रार निवारण समिती गठित करावयाची आहे. त्यासाठी खालील अहर्ता प्राप्त सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहे.
अध्यक्ष पदासाठी सामाजिक कार्याचा 5 वर्षाचा अनुभव असलेल्या आणि महिलांच्या सोयीसाठी बांधिल असलेल्या महिलांमधून नामनिर्देशिनाने अध्यक्षांची नियुक्ती करण्यात येईल. तर दोन सदस्य पदासाठी महिलांच्या सोयीसाठी बांधिल असलेल्या अशासकीय संघटना/ संघ किंवा लैगिक छळाच्या प्रश्नांशी परिचीत असलेल्या व्यक्तीमधून दोन सदस्य नामनिर्देशित करण्यात येईल व त्यापैकी किमान एक महिला राहील.
परंतु, त्यापैकी किमान एक नामनिर्देशित सदस्याची पाश्वभूमी प्राधान्याने कायद्याची असावी. तसेच त्यापैकी किमान एक नामनिर्देशित सदस्य अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती किंवा इतर मागासवर्ग अल्पसंख्यांक समाजातील महिला असावी. उपरोक्त अर्हताधारक सामाजिक कार्यकर्त्यांनी परीपूर्ण प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जुना कलेक्टर बंगला, आकाशवाणीच्या मागे, साईबाबा वार्ड, चंद्रपूर या कार्यालयात 31 डिसेंबर 2024 पर्यंत सादर करावा, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment