तृतीयपंथीयांना प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 13 : जिल्हयातील तृतीयपंथीय व्यक्तींना नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन या केंद्र शासनाच्या पोर्टलद्वारे तृतीयपंथी असल्याबाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र उपलब्ध करून द्यावयाचे आहे. त्यासाठी तृतीयपंथीयांची कागदपत्रासह माहिती आवश्यक आहे.
त्याकरीता तृतीयपंथीयासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, तृतीयपंथीयांची मंडळे किंवा संघटना येथील प्रतिनिधीनी किंवा स्वत: तृतीयपंथीय व्यक्तींने सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, चंद्रपूर कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
तसेच तृतीयपंथीय असल्याबाबतची वैयक्तिक व रहिवाशी पुराव्याबाबतची माहिती त्वरीत सादर करावी. जेणेकरून, आपले माहितीच्या आधारे नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन पोर्टलवर माहिती भरून तृतीयपंथी असल्याबाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यात येईल, असे समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांनी कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment