चिमूर तालुक्यातील शेतक-यांसाठी
28 डिसेंबर रोजी लायसन्स कॅम्पचे आयोजन
चंद्रपूर दि. 26 : जिल्ह्यातील वाहनांची तपासणी करतांना बहुतेक शेतक-यांकडे लायसन्स नसल्याचे निदर्शनास येत आहे. शेतमालाची वाहतुक करण्याकरीता ट्रॅक्टर, टॉलीचा तसेच इतर शेतीच्या कामासाठी दुचाकी वाहनांचा वापर करण्यात येतो. तथापि, दुर्देवाने अपघात झाल्यास शेतकऱ्यांकडे लायसन्स नसल्यामुळे नुकसान भरपाई मिळण्यास अडचणी निर्माण होत आहे. याकरीता, चिमूर तालुक्यातील शेतकरी वर्गासाठी शिकाऊ लायसन्सकरीता 28 डिसेंबर 2024 रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.
या शिबिराकरीता दि. 27 डिसेंबरपासून ऑनलाईन अपॉईंटमेंट खुले करण्यात येतील. कोणत्याही मध्यस्थ व एजंटमार्फत न येता सी.एस.सी. केंद्रामधून विहीत शासकीय शुल्क भरणा करुनच अर्ज सादर करावा. अर्ज करतेवेळी काही अडचण आल्यास सहायक मोटार वाहन निरीक्षक कमलेश खाडे यांचेशी 9657059899 या भ्रमणध्वनी क्रमाकांवर संपर्क साधावा. तसेच या शिबिराचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे.
००००००
No comments:
Post a Comment