नझुल जमीनधारकांनी ‘अभय योजना’ विशेष शिबीराचा लाभ घ्यावा
Ø 26 व 27 डिसेंबर रोजी विशेष शिबीराचे आयोजन
चंद्रपूर, दि.24: निवासी प्रयोजनार्थ भाडेतत्वावर दिलेल्या नझुल जमिनीबाबत शासनाच्या वतीने ‘अभय योजना 2024-25’ राबविण्यात येत आहे. नझुल भुखंड धारकातील सत्ताप्रकार ‘ब’ मधून ‘अ’ मध्ये व लिज नुतनीकरणासाठी चंद्रपूर तहसील कार्यालयाकडून दि. 26 व 27 डिसेंबर 2024 रोजी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे.
सदर शिबीर झोन क्र.1 संजय गांधी मार्केट सिव्हील लाईन, झोन क्र.2 चंद्रपूर शहर महानगरपालिका (सात मजली इमारत) व झोन क्र.3 बंगाली कॅम्प, चंद्रपूर शहर महानगरपालिका या ठिकाणी होणार आहेत. या शिबीरामध्ये सत्ताप्रकार ‘ब’ धारणाधिकार असलेले नझुल भुखंडधारक यांना लागणारे कागदपत्रे व धारणाधिकार बदलण्याची प्रक्रिया याबाबत शिबीरामध्ये ‘अभय योजना 2024-25’ अंतर्गत विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
तरी, सर्व नझुल भुखंडधारकांनी तहसील कार्यालय, चंद्रपूर यांचेकडून राबविण्यात येणारी ‘अभय योजना 2024-25’ या विशेष शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार विजय पवार यांनी केले आहे.
0000000
No comments:
Post a Comment