Search This Blog

Thursday, 19 December 2024

धान/भरडधान्य खरेदीसाठी शेतकरी नोंदणीस 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

धान/भरडधान्य खरेदीसाठी शेतकरी नोंदणीस 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

चंद्रपूर, दि. 19 : खरीप पणन हंगाम 2024-25 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान व भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणी करण्याकरिता 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

तरी, खरीप पणन हंगाम 2024-25 मधील धान व भरडधान्य खरेदीकरीता शेतकरी नोंदणीसाठी दि. 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असल्याने जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करुन घ्यावी, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी व्ही. एस. तिवाडे यांनी कळविले आहे..

00000 

No comments:

Post a Comment