Search This Blog

Monday, 30 December 2024

अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांकरिता परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

         अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांकरिता परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

Ø  31 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि.30:अल्पसख्यांक विकास विभागांतर्गत अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांकरीता परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी मिळावयाच्या परदेश शिष्यवृत्ती जागा निवडीसाठी सन 2024-25 करीता पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

योजनेच्या अटी व शर्ती:

विद्यार्थी अल्पसंख्याक समुदायातील तसेच महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्षे, पीएचडीसाठी 40 वर्षे ही कमाल वयोमर्यादा असेल. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त नसावे. (विवाहित महिला उमेदवारांनी पतीकडील कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्नाचा दाखला देणे आवश्यक आहे. जर विवाहित महिला उमेदवार विधवा, घटस्फोटीता असून वडिलांकडे वास्तव्यास असल्यास महिला उमेदवाराने वडिलाकडील कुटुंबाच्या उत्पन्नानुसार अर्ज केल्यास तसे कायदेशीर कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.) परदेशी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत दोन वर्षे कालावधीचाच एमबीए अभ्यासक्रम अनुज्ञेय राहील. शिष्यवृत्ती द्यावयाच्या एकूण जागेपैकी 30 टक्के जागांवर मुलींची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल. जर त्या प्रमाणात मुलींचे प्रवेश अर्ज प्राप्त न झाल्यास त्या जागेवर मुलांची गुणवत्तेनुसार निवड करण्याचे अधिकार निवड समितीला राहतील. एकाच कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलांना परदेश शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल. पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पदवी परीक्षेत व पीएचडी साठी पदव्युत्तर परीक्षेत किमान 55 टक्के गुण असणे आवश्यक आहे. ही पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम त्याने अर्जाच्या दिनांकाला उत्तीर्ण केलेला असावा. परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत (QS World University Rank) 200 च्या आत असावी.

लाभाचे स्वरुप:

परदेशातील शैक्षणिक संस्थेने ऑफर लेटर मध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक कालावधीसाठी लागू केलेली संपूर्ण शिक्षण फी, अभ्यासक्रमासाठी नजिकच्या मार्गांनी इकॉनॉमी क्लास विमान प्रवास भाडे (परतीच्या प्रवासासह), निर्वाह भत्ता, वैयक्तिक आरोग्य विमा यावरील विद्यार्थ्यांने प्रत्यक्ष केलेला खर्च विहित केलेल्या वित्तीय मर्यादेत मूळ शुल्क भरणा पावती, प्रवासाचे मूळ तिकीट, मूळ बोर्डींग पास आदी तपासून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर भारतीय रुपयामध्ये प्रतिपूर्ती केले जाईल.

विद्यार्थ्यांने वेबसाईटवरुन अर्ज डाऊनलोड करुन परिपुर्ण व आवश्यक त्या कागदपत्रासह दि. 31 डिसेंबर 2024 पर्यंत सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत ऑनलाईन भरुन त्याची प्रिंट, समक्ष किंवा पोस्टाने समाजकल्याण आयुक्तालय, 3 चर्च रोड, पुणे-411001 येथे सादर करावा. तसेच https://fs-maharashtra.gov.in या ऑनलाईन पोर्टलवर माहिती भरावी. अर्जाचा नमुना व अधिक सविस्तर माहितीसाठी शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ताज्या घडामोडी या लिंकवर जाऊन भेट द्यावी.

 

तरी,अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, समाजकल्याण यांनी केले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment