16 डिसेंबर रोजी महिला लोकशाही दिन
चंद्रपूर, दि. 12 : प्रत्येक महिन्याच्या तिस-या सोमवारी जिल्हा स्तरावर व चवथ्या सोमवारी तालुका स्तरावर महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. डिसेंबर महिन्याचा तिसरा सोमवार 16 डिसेंबर रोजी असल्यामुळे या दिवशी सकाळी 11 वाजता निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
महिला लोकशाही दिनी न्याय प्रविष्ठ प्रकरणे, सेवाविषयक, आस्थापना बाबी विषयक व विहित अर्जात नसलेली प्रकरणे स्वीकारण्यात येणार नाही. तरी ज्या महिलांचे वरील बाबी सोडून तक्रार / निवेद वैयक्तिक स्वरुपात असेल, अशा तक्रारी महिला लोकशाही दिनाच्या 15 दिवसांपूर्वी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, चंद्रपूर यांच्या कार्यालयात दोन प्रतीत अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनास प्राप्त तक्रार संबंधित विभागाला पाठवून अर्जाचा निपटारा करण्यात येईल, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांनी कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment