Search This Blog

Monday, 16 December 2024

हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध व त्यांचे पुनर्वसन:

 

हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या

नियुक्तीस प्रतिबंध व त्यांचे पुनर्वसन:

दक्षता समितीत अशासकीय सदस्य नियुक्ती करिता प्रस्ताव आमंत्रित

चंद्रपूर, दि. 16 : हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन याबाबत अधिनियम 2013 (2013 चा 25) च्या कलम 24 (1) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून या अधिनियमांच्या प्रयोजनार्थ दिलेल्या अशासकीय सदस्यांचा समावेश असलेला जिल्हास्तरावर दक्षता समिती गठीत करण्यात आली आहे.

त्याअनुषंगाने, जिल्हा दक्षता समितीत हाताने मैला उचलण्याचे, सफाई काम करण्यास प्रतिबंध करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या संघटनेचे आणि हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे पुनर्वसन करणाऱ्या संघटनेचे किंवा जिल्हा विभागात राहणारे कर्मचारी समुदायाचे प्रतिनिधित्व करणारे यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहे. जिल्हादंडाधिकारी यांनी नामनिर्देशित करावयाचे चार सामाजिक कार्यकर्ते, ज्यामध्ये दोन महिला कार्यकर्त्या असेल अशा इच्छुक प्रतिनिधींनी शैक्षणिक प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र आदी आवश्यक कागदपत्रासह सदर प्रस्ताव 30 डिसेंबर 2024 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर या कार्यालयात सादर करावा. असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment