Search This Blog

Wednesday, 2 July 2025

अल्पसंख्यांक समाजातील उमेदवारांसाठी पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण

 अल्पसंख्यांक समाजातील उमेदवारांसाठी पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण

Ø जुलै रोजी अर्ज सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर,दि. 2 :  अल्पसंख्यांक समाजातील उमेदवारांना स्पर्धा परिक्षेमध्ये समान संधी प्राप्त होण्याच्या दृष्टीने संस्थेद्वारा प्रशिक्षण कार्यान्वित करण्यात आले आहेत्यासंदर्भात निवासी पोलिस भरती पुर्व प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरीता चंद्रपूर जिल्हयातील अल्पसंख्याक समाजातील प्रवर्गाकरीता जसे 1) मुस्लिम, 2) बौध्द 3) शीख 4) खिश्चन 5) जैन 6) पारशी या अल्पसंख्याक समाजातील इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेतउमेदवारांनी जुलै रोजी सकाळी 11 वाजता चंद्रपूर जिल्हा मुख्यालयातीलपोलीस ग्राऊंडयेथे उपस्थित राहून अर्ज सादर करावेत.

            प्रशिक्षणार्थी उमेदवारांच्या निवडीसाठी अटी व शर्ती : 1) प्रशिक्षणार्थीचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न लाखांपेक्षा जास्त नसावे. (तहसिलदार/नायब तहसिलदार यांचे उत्पन्न प्रमाणपत्रानुसार) 2) उमेदवार हा अल्पसंख्याक समाजातील मुस्लिमबौध्द शिख ख्रिश्चनजैनपारशी असावा. 3) उमेदवार हा 18 ते 25 वर्ष वयोगटातील असावा. (मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत शासनाने वेळोवेळी ठरविलेल्या धोरणानुसार वयोमर्यादित सुट देय राहील.) 4) उमेदवारांची उंची पुरुष 165 सेंमी (छाती 79 सेंमी व फुगवून 84 सेमी.) महिला उमेदवारांसाठी उंची 155 सेंमी असावी. 6) शैक्षणिक पात्रता 12 वी पास असावा व सर्व कागदपत्रे आणणे आवश्यक आहे. 6) उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. 7) उमेदवार शारिरिकदृष्ट्या निरोगी व सक्षम असावा. 8) रहिवासी दाखला व ओळखत्राची सत्यप्रत देणे आवश्यक राहील. 9) सदर योजनेंतर्गत प्रशिक्षणाचा कालावधी महिन्यांचा निवासी राहिलअसे सहायक जिल्हा नियोजन अधिकारी यांनी कळविले आहे.

००००००

Tuesday, 1 July 2025

उत्कृष्ट परसबाग निर्मितीकरीता जिल्ह्यातील 93 शाळांना बक्षीसे

 

उत्कृष्ट परसबाग निर्मितीकरीता जिल्ह्यातील 93 शाळांना बक्षीसे

चंद्रपूर,दि 1 : विद्यार्थ्यांच्या शारीरीक व बौध्दिक विकासाकरीता शाळांच्या परसबागेत नैसर्गिकरीत्या (सेंद्रिय अन्नपिकवलेला ताजा व पौष्टिक भाजीपाल्याचा लाभ देण्याकरीता प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत उत्कृष्ट परसबाग स्पर्धा’ आयोजित करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहेया योजनेंतर्गत जिल्ह्यातील एकूण 93 शाळांना 3 लक्ष 56 हजार रुपयांची बक्षीसे देण्यात आली आहेत.

            शासन निर्णयात दिलेल्या 1) परसबागेची रचना / आराखडा, 2) हवामान परिस्थितीनुसार भाज्यांची लागवड, 3) परसबागेचे व्यवस्थापन, 4) विद्यार्थीपालक व शिक्षकांचा सहभाग, 5) उत्पादीत भाजीपाल्यांचा आहारामधील समावेश, 6) परसबागेतील भाज्याची विक्री 7) सामाजिक संस्था यांचे परसबाग उभारणीमधील योगदान, 8) शाळेमध्ये ईको क्लबची स्थापना व त्याअंतर्गत राबवलेले उपक्रम इनिकषांच्या आधारे गुणाकंन करण्यात येते.

           मागील वर्षी प्रधानमंत्री पोषण शक्ती  निर्माण योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील 2004 पैकी 1735 शाळेने परसबाग तयार केली होतीप्रत्येक तालुक्यातून प्रथमद्वितीयतृतीय व प्रोत्साहनपर शाळा अशा तालुका स्तरावरील 90 शाळांना लक्ष 22 हजार 500 रुपये व जिल्हा स्तरावरील शाळांना 33 हजार 500 असे तालुकास्तर व जिल्हास्तर मिळून एकूण्‍ 93 शाळांना लक्ष 56 हजार रुपयांची बक्षीसे देण्यात आली.

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी विद्यार्थी व पालकांच्या सहभागातून सुंदर व उत्कृष्ट परसबागेची निर्मिती करावी व उत्कृष्ट परसबाग स्पर्धामध्ये सहभाग नोंदवावाअसे आवाहन उपशिक्षणाधिकारी (प्राथमिकविशाल देशमुख यांनी केले आहे.

००००००

‘त्या’ दिवशी कर्मचारी मोजणी व सनद वसुली कामावर


 त्या’ दिवशी कर्मचारी मोजणी व सनद वसुली कामावर

Ø कोरपना येथील भुमी अभिलेख उपअधिक्षकाचे स्पष्टीकरण

Ø अर्जदाराला त्वरीत देण्यात आली नक्कल

चंद्रपूरदि. 1 : भुमी अभिलेख कार्यालयाचे काम हे मोजणी संदर्भात असून येथील अधिकारी व कर्मचारी असे एकूण 4 जण 20 जून 2025 रोजी मोजणीच्या तसेच सनद वसुलीच्या कामावर होते. लखमापूर येथील सत्यपाल थिपे हे सदर दिवशी कार्यालयात नकला घेण्यासाठी आले असता त्यांना उपलब्ध मनुष्यबळाच्या माध्यमातून अभिलेखाची नक्कल त्याच दिवशी देण्यात आली, असे स्पष्टीकरण कोरपना येथील भुमी अभिलेख विभागाचे उपअधिक्षक प्र.ना. बढीये यांनी दिले आहे.

सदर कार्यालयाच्या आस्थापनेच्या तक्याप्रमाणे एकूण कर्मचारी मोजणीवर सनद वसुली करण्याकरीता दौऱ्यावर होतेतसेच रजेवर/गैरहजर /सेवावर्ग असलेले कर्मचारी आहेत आणि कार्यालयात कर्मचारी उपस्थित होते. 3 शिपाई पदे रिक्त असून एकूण 15अधिकारी कर्मचारी यांची आस्थापना आहेअर्जदार सत्यापाल भाऊजी  थिपे रालखमापूर हे 20 जून 2025 रोजी अभिलेखाचे नकला घेण्यासाठो कार्यालयात आले होतेत्यांच्यासोबत इतर धारकही कार्यालयामध्ये हजर होतेकार्यालयात हजर असलेले छाननी लिपीक वसंत जाधव यांना सदर धारकांच्या नकलाचे काम तात्काळ काम करून देण्याबाबत तोंडी सुचना देण्यात आल्यात्याप्रमाणे जाधव यांनी नकला करण्यास सुरुवात केली.

श्रीथिपे यांच्यासोबत आलेल्या व्यक्तिंनी सदर नक्कल लवकरात लवकर देण्याची मागणी केलीभूकरमापक श्रीघोंगे हे सनद वसुलीवर गेले होतेते आल्यानंतर त्यांची स्वाक्षरी घेऊन नकला देण्याची अर्जदार यांना विनंती केलीमात्र अर्जदार हे काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतेत्यांनी मुख्यालय सहाय्यक यांच्या खाली रूमचा फोटो घेतलावास्तविक पाहाता अर्जदार सत्यापाल थिपे यांना सदरची नक्कल त्याच दिवशी देण्यात आली व इतर अर्जदारांना सुध्दा नकला देण्यात आलेत्यांचा अर्ज या कार्यालयात शिल्लक नाहीयात कार्यालयाची कोणत्याही प्रकराची चुक नाही.

कार्यालय खाली राहण्याचे कारण कीआस्थापना तक्ताप्रमाणे मोजणीवर व सनद वसुली करीता गेलेले कर्मचारीसेवावर्गगैरहजर असलेले आणि रिक्त पदे असलेले कर्मचारी यांची एकूण संख्या 12 असून सदर दिवशी कार्यालयात फक्त कर्मचारी व कार्यालय प्रमुख हजर होतेअसे कोरपना भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधिक्षक श्रीबढीये यांनी कळविले आहे.

००००००

तुमच्या कुटुंबाचे सिकलसेल स्टेटस तपासले का ?

 

तुमच्या कुटुंबाचे सिकलसेल स्टेटस तपासले का ?

चंद्रपूर,दि. 1 : सिकलसेल आजारासंबंधीची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणेआजाराचा संपूर्ण नायनाट व्हावामहाराष्ट्र सिकलसेल मुक्त व्हावेतसेच या आजाराच्या विळख्यातून सर्वांची सुटका व्हावीया उद्देशाने सिकलसेल जनजागृती पंधरवडा राबविण्यात येत आहे.

           सिकलसेल हा एक आनुवंशिक आजार आहेतो आई-वडिलांकडून मुलांकडे येतोआपल्या मुलांना हा वारसा मिळू नयेअसे वाटत असेल तर प्रथम आई-वडिलांनी आपण सिकलसेल वाहक म्हणजेच कॅरिअर किंवा पिडीतग्रस्त तर नाही नाहे जाणून घ्यायला पाहिजेआनुवंशिक गुणसूत्राने येणारा हा आजार रक्तातील हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे होतोया आजारात हिमोग्लोबिन मधील ग्लोबिन हे अबनॉर्मल असतेत्यामुळे तांबड्या पेशी तयार होतानात्या विकृत म्हणजेच डिफेक्टिव्ह तयार होतात.

या विकृत तांबड्या पेशीची ऑक्सिजन शोषून घेण्याची क्षमता कमी असल्यामुळे या पेशी शरीराला प्राणवायुचा पुरवठा योग्य प्रकारे करू शकत नाहीतयाला सिकलसेल पिडीतग्रस्त असे म्हणतातत्यामुळेच या आजाराची सर्व लक्षणे दिसतातहा आजार आई-वडील दोघेही सिकलसेल वाहक म्हणजेच कॅरिअर असल्यामुळे 25 टक्के मुले पिडीतग्रस्त होतातया आजारासाठी रक्त घेतल्यामुळे हिपेटायटिस किंवा एचआयव्हीसारखे आजार होतात आणि लोहाचे प्रमाण जास्त झाल्यामुळे त्याचे दुष्परिणाम दिसून येतात व त्यामुळे मृत्यु होण्याची शक्यता असते.

                आई-वडिलांनी मुलाला जन्म देण्यापूर्वी ही तपासणी करणे गरजेचे आहेही रक्ताची साधी सोपी सरळ टेस्ट आहेत्यालाच HPLC किंवा हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमैटोग्राफी असे म्हणतातही तपासणी आयुष्यात एकदाच करावयाची आहे. 1 ते 40 वयोगटातील सर्व व्यक्तीने आवर्जुन तपासणी करून घ्यावीचंद्रपूर जिल्ह्यात सर्व शासकिय प्राथमिक आरोग्य केंद्रग्रामीणउपजिल्हाजिल्हा रुग्णालय स्तरावर मोफत HPLC तपासणी होतेचंद्रपूर जिल्ह्यात सर्व शासकिय आरोग्य संस्थेत नियमित मोफत औषधोपचार व जिल्हा रुग्णालय स्तरावर रक्तसंक्रमण केले जातेकोणताही सिकलसेल रुग्ण औषध उपचारापासून वंचित राहू नयेयाकरिता चंद्रपूर जिल्ह्यात सर्व आरोग्य संस्थेत मुबलक फॉलिक ऍसिड व हायड्राक्सियूरिया औषध उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

रुग्णांनी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार नियमित औषधे घेतल्यास रुग्णांना होणारा त्रास कमी होऊन आयुष्यमान वाढण्यास मदत होतेया रोगापासून मुक्ती मिळवायची असेल तर स्वतः व आपल्या कुटुंबाचे सिकलसेल तपासून घ्याटेस्टमध्ये आपण सिकलसेल वाहक म्हणजेच कॅरिअर निघालो तर 

1. विवाह करताना आपल्या पार्टनरची HPLC ही तपासणी करून घ्यावी.

2. डॉक्टरांकडे गेल्यावर तुम्ही सिकलसेल वाहक म्हणजेच कॅरिअर आहोत हे सांगणे आवश्यक

3. गर्भवती महिलांची पहिल्या खेपेच्या तीन महिन्याच्या आत ही टेस्ट करून घेणे.

या आजाराबाबत समाजात असलेले गैरसमजअंधश्रध्दा दूर करून या आजाराची अचूक माहिती जनसामान्य लोकांपर्यत पोहचविणे आवश्यक आहेहे एकट्या आरोग्य विभागाचेच कार्य नाही तर या आजाराच्या निर्मूलनासाठी सेवाभावी सामाजिक संस्थांनी लोकचळवळ निर्माण करणे आवश्यक आहेअसे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉअशोक कटारे यांनी केले आहे.

००००००

विकसित महाराष्ट्र -2047 च्या अनुषंगाने अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन

 

विकसित महाराष्ट्र -2047 च्या अनुषंगाने अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन

            चंद्रपूर,दि. 1 : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मे ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत 150 दिवसांचा कार्यक्रम राबविण्याची घोषणा केली आहेत्यामध्ये विकसित महाराष्ट्र -  2047 चे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याचा समावेश आहे.

विकसित महाराष्ट्र -  2047 च्या नागरिक सर्वेक्षणाऱ्या अनुषंगाने सर्व नागरिकांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याणचंद्रपूर या कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेबद्दल आपले अभिप्राय सूचित करण्यात यावेअसे आवाहन सहाय्यक आयुक्तसमाज कल्याण विनोद मोहतुरे यांनी केले आहे.

००००००