Search This Blog

Tuesday, 1 July 2025

तुमच्या कुटुंबाचे सिकलसेल स्टेटस तपासले का ?

 

तुमच्या कुटुंबाचे सिकलसेल स्टेटस तपासले का ?

चंद्रपूर,दि. 1 : सिकलसेल आजारासंबंधीची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणेआजाराचा संपूर्ण नायनाट व्हावामहाराष्ट्र सिकलसेल मुक्त व्हावेतसेच या आजाराच्या विळख्यातून सर्वांची सुटका व्हावीया उद्देशाने सिकलसेल जनजागृती पंधरवडा राबविण्यात येत आहे.

           सिकलसेल हा एक आनुवंशिक आजार आहेतो आई-वडिलांकडून मुलांकडे येतोआपल्या मुलांना हा वारसा मिळू नयेअसे वाटत असेल तर प्रथम आई-वडिलांनी आपण सिकलसेल वाहक म्हणजेच कॅरिअर किंवा पिडीतग्रस्त तर नाही नाहे जाणून घ्यायला पाहिजेआनुवंशिक गुणसूत्राने येणारा हा आजार रक्तातील हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे होतोया आजारात हिमोग्लोबिन मधील ग्लोबिन हे अबनॉर्मल असतेत्यामुळे तांबड्या पेशी तयार होतानात्या विकृत म्हणजेच डिफेक्टिव्ह तयार होतात.

या विकृत तांबड्या पेशीची ऑक्सिजन शोषून घेण्याची क्षमता कमी असल्यामुळे या पेशी शरीराला प्राणवायुचा पुरवठा योग्य प्रकारे करू शकत नाहीतयाला सिकलसेल पिडीतग्रस्त असे म्हणतातत्यामुळेच या आजाराची सर्व लक्षणे दिसतातहा आजार आई-वडील दोघेही सिकलसेल वाहक म्हणजेच कॅरिअर असल्यामुळे 25 टक्के मुले पिडीतग्रस्त होतातया आजारासाठी रक्त घेतल्यामुळे हिपेटायटिस किंवा एचआयव्हीसारखे आजार होतात आणि लोहाचे प्रमाण जास्त झाल्यामुळे त्याचे दुष्परिणाम दिसून येतात व त्यामुळे मृत्यु होण्याची शक्यता असते.

                आई-वडिलांनी मुलाला जन्म देण्यापूर्वी ही तपासणी करणे गरजेचे आहेही रक्ताची साधी सोपी सरळ टेस्ट आहेत्यालाच HPLC किंवा हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमैटोग्राफी असे म्हणतातही तपासणी आयुष्यात एकदाच करावयाची आहे. 1 ते 40 वयोगटातील सर्व व्यक्तीने आवर्जुन तपासणी करून घ्यावीचंद्रपूर जिल्ह्यात सर्व शासकिय प्राथमिक आरोग्य केंद्रग्रामीणउपजिल्हाजिल्हा रुग्णालय स्तरावर मोफत HPLC तपासणी होतेचंद्रपूर जिल्ह्यात सर्व शासकिय आरोग्य संस्थेत नियमित मोफत औषधोपचार व जिल्हा रुग्णालय स्तरावर रक्तसंक्रमण केले जातेकोणताही सिकलसेल रुग्ण औषध उपचारापासून वंचित राहू नयेयाकरिता चंद्रपूर जिल्ह्यात सर्व आरोग्य संस्थेत मुबलक फॉलिक ऍसिड व हायड्राक्सियूरिया औषध उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

रुग्णांनी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार नियमित औषधे घेतल्यास रुग्णांना होणारा त्रास कमी होऊन आयुष्यमान वाढण्यास मदत होतेया रोगापासून मुक्ती मिळवायची असेल तर स्वतः व आपल्या कुटुंबाचे सिकलसेल तपासून घ्याटेस्टमध्ये आपण सिकलसेल वाहक म्हणजेच कॅरिअर निघालो तर 

1. विवाह करताना आपल्या पार्टनरची HPLC ही तपासणी करून घ्यावी.

2. डॉक्टरांकडे गेल्यावर तुम्ही सिकलसेल वाहक म्हणजेच कॅरिअर आहोत हे सांगणे आवश्यक

3. गर्भवती महिलांची पहिल्या खेपेच्या तीन महिन्याच्या आत ही टेस्ट करून घेणे.

या आजाराबाबत समाजात असलेले गैरसमजअंधश्रध्दा दूर करून या आजाराची अचूक माहिती जनसामान्य लोकांपर्यत पोहचविणे आवश्यक आहेहे एकट्या आरोग्य विभागाचेच कार्य नाही तर या आजाराच्या निर्मूलनासाठी सेवाभावी सामाजिक संस्थांनी लोकचळवळ निर्माण करणे आवश्यक आहेअसे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉअशोक कटारे यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment