Search This Blog

Wednesday, 23 July 2025

डाक विभागात IT 2.0 प्रणालीची अंमलबजावणी

 डाक विभागात IT 2.0 प्रणालीची अंमलबजावणी

चंद्रपूरदि. 23 :  डाक विभागाद्वारे पुरविण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये मोठे बदल घडवून आणण्याचे सरकारने ठरविले आहे. त्याकरीता डाक विभागात IT 2.0 या संगणकीय प्रणालीची अंमलबजावणी होणार आहे. या प्रणालीमुळे डाक विभागाद्वारे पुरविण्यात येणारी सेवा ही अचुकजलद व ग्राहकाभिमुख होईल.

सदर IT 2.0 प्रणालीची अंमलबजावणी 5 ऑगस्ट 2025 रोजी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील सर्व डाकघरात होणार आहे. याकरीता Data Transfer ही अत्यंत महत्वाची प्रक्रीया असतेजी  4 ऑगस्ट रोजी केल्या जाईल. या कारणामुळे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील डाक विभागाशी संबंधीत सर्व कामे ही दिनांक 4 ऑगस्ट रोजी बंद राहतील. सर्व ग्राहकांना विनंती आहे कीत्यांचे डाक विभागाशी संबंधीत जी काही तातडीची कामे आहेतते कृपया 2 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करुन घ्यावे.

 ग्राहकांच्याच हितासाठी व त्यांना अचूकजलद व ग्राहकाभिमुख सेवा मिळावीयाच उद्देशाने हे सर्व प्रयत्न केल्या जात आहेत. तरी सर्व ग्राहकांनी यांची कृपया नोंद घ्यावीअसे आवाहन वरिष्ठ डाक अधिक्षक एस. रामाक्रिष्णा यांनी केले आहे.

00000000

No comments:

Post a Comment