Search This Blog

Wednesday, 16 July 2025

आदिवासी विकास विभागातर्फे रानभाजी महोत्सवाचे आयोजन


आदिवासी  विकास विभागातर्फे रानभाजी महोत्सवाचे आयोजन

Ø 18 ते 22 जुलै दरम्यान आयोजन

चंद्रपूरदि. 16 :  सन 2025-26 मध्ये केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत आदिवासी भागातील रानभाजीरानफळेवनऔषधेअन्नधान्य आणि आदिवासी बांधवाच्या शबरी नॅचरल ब्रॅन्डच्या प्रिमीयम उत्पादनाची विक्री करून रोजगारांची संधी उपलब्ध होण्यासाठी आदिवासी विकास विभागचंद्रपूरच्यावतीने 18 ते 22 जुलै 2025 या कालावधीत शहरातील मौलाना अब्दुल कलाम आझाद गार्डन येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

पावसाळ्यामध्ये विशेषत: आदिवासी पट्टयामध्ये उपलब्ध असलेल्या पारंपरिक रानभाज्या गोळा करणेशहराच्या ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध करून देणेशहरी भागातील लोकांना रानभाज्यांचे आयुर्वेदिक तसेच त्यामध्ये उपलब्ध असलेली पोषणमुल्य यांचे महत्त्व पटवून देणेआदिवासी बांधवांच्या प्रिमियम उत्पादनांच्या शबरी नॅचरल्स ब्रॅन्डला बाजारपेठ उपलब्ध करून देणेव या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणेहा या रानभाजी महोत्सवाचा महत्वाचा उद्देश आहे.

दि. 18 ते 22 जुलै या कालावधीत मौलाना अब्दुल आझाद गार्डनजयंत टॉकीज समोरमेन रोडचंद्रपुर येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या प्रकल्प कार्यक्षेत्रातील रानभाजीरानफळेवनऔषधेअन्नधान्य इत्यादी क्षेत्रात संकलनउत्पादनकरणाऱ्या नोंदणीकृत आदिवासी बचत गटव्यक्ती तसेच सामाजिक संस्था यांचा सहभाग या महोत्सवामध्ये राहणार आहे.

शहरातील नागरिकांनी रानभाजी महोत्सवाला भेट देवून रानभाज्यांची ओळखत्यांचे गुणधर्मरेसिपी यांची माहिती जाणून घ्यावी. तसेच रानभाज्यांची खरेदी करून आदिवासी विक्रेत्यांचा उत्साह वाढवावाअसे आवाहन प्रकल्प अधिकारी  विकास राचेलवार यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment