Search This Blog

Wednesday, 9 July 2025

राज्य शासनाच्या 'उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024' साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता 19 जुलै पर्यंत मुदतवाढ

 

राज्य शासनाच्या 'उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता 19 जुलै पर्यंत मुदतवाढ

 मुंबईदि. ४ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिताउत्कृष्ट लेखनउत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथाउत्कृष्ट छायाचित्रकारसमाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठो पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. था स्पर्धेसाठी दिनांक १ जानेवारी. २०२४ ते ३१ डिसेंबर२०२४ पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/व्रतकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दि. ३१ जानेवारी२०२५ असा होता. आता या पुरस्कारासाठी प्रवेशिका मागविण्याकरिता दि. १९ जुलै२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनीमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयतळमजलाहुतात्मा राजगुरु चौकमादाम कामा मार्गमंत्रालयमुंबई-३२. येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने http://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

000000

No comments:

Post a Comment