धनादेश न वटवलेल्या विद्यार्थ्यांनी त्वरीत संपर्क करण्याचे आवाहन
Ø राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार
चंद्रपूर, दि. 16 : इयत्ता 10 वी व 12 वी परिक्षांमध्ये विशेष उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार’ देण्यात येतो. सन 2022-23 व 2023-24 या शैक्षणिक वर्षांत पात्र विद्यार्थ्यांना धनादेशाद्वारे पुरस्काराचे वितरण करण्यात आले होते. मात्र, अद्यापही काही विद्यार्थ्यांनी त्यांना प्राप्त झालेला धनादेश बँकेत वटविलेला नाही, असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर यांनी कळविले आहे.
अशा विद्यार्थ्यांची यादी सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चंद्रपूर येथे तसेच सदर कार्यालयाच्या https://acswchandrapur.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी यादी प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून एका महिन्याच्या आत सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, चंद्रपूर येथे पूर्वीचा धनादेश जमा करून नवीन धनादेश प्राप्त करावा.
जर या कालावधीत विद्यार्थ्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही, तर पुरस्काराची रक्कम शासन खात्यात परत जमा करण्यात येईल. त्यानंतर अशा विद्यार्थ्यांना पुन्हा धनादेश मिळणार नाही, याची स्पष्ट सूचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे यादीतील सर्व विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत संबंधित कार्यालयात संपर्क साधून आवश्यक कार्यवाही करावी, अन्यथा यासाठी स्वतः विद्यार्थीच जबाबदार राहील, असेही आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विनोद मोहतुरे यांनी केले आहे.
00000

No comments:
Post a Comment