Search This Blog

Friday, 4 July 2025

स्वयंरोजगाराकरीता कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

स्वयंरोजगाराकरीता कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 4 : वसंतराव नाईक विमुक्त जाती  भटक्या जमाती विकास महामंडळ मार्फत विमुक्त जाती  भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील लोकांकरीता आणि पैलवान मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ  राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ या दोन उपकंपनी मार्फत वडार  रामोशी समाजातील लोकांकरीता स्वयंरोजगारासाठी कर्ज योजना राबविण्यात येतात.

या माध्यमातुन कृषी सलंग्न व्यवसायलघुउद्योगवाहतुक क्षेत्रातील संबंधित व्यवसायतांत्रिक व्यवसायपारंपारिक व्यवसाय अथवा सेवा उद्योग सुरु करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँक  महामंडळ यांच्या संयुक्त माध्यमातून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना  गट कर्ज व्याज परतावा योजना सुरू आहेवैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 15 लक्ष रुपयांपर्यंत तर गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत 50 लक्ष रुपर्यांपर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतोसदर दोन्ही योजनांनमध्ये लाभार्थ्याला मुद्दल आणि व्याज बँकेत भरावयाची आहेत्यानंतर महामंडळ व्याजाची रक्क्म 12 टक्के पर्यंत लाभार्थ्याच्या वैयक्तिक खात्यात जमा होतेया योजनेच्या सर्व मार्गदर्शक सुचना महामंडळाच्या www.vjnt.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेसदर योजनेच्या लाभासाठी संकेतस्थळावरील पोर्टलद्वारे ऑनलाईन प्रस्ताव सादर करावयाचा आहे.

तसेच बीज भांडवल कर्ज योजनेअंतर्गत लक्ष रुपयांपर्यंत (बँक सहभाग 75 टक्के  महामंडळ सहभाग 25 टक्केमहामंडळाच्या 25 टक्के सहभागावर टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा करण्यात येतेतसेच थेट कर्ज योजने अंतर्गत लक्ष रुपयांपर्यत बिनव्याजी कर्ज पुरवठा करण्यात येतोसदर योजने करीता महामंडळाच्या कार्यालयात अर्ज उपलब्ध आहेत.  अधिक माहिती करीता महामंडळाच्या कार्यालयात येऊन संपर्क साधावाजास्तीत जास्त इच्छुक व्यक्ती  संस्थांनी सदर योजनेचा लाभ घ्यावाअसे आव्हान जिल्हा व्यवस्थापक वसंतराव नाईक विमुक्त जाती  भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.) यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment