Search This Blog

Monday, 21 July 2025

22 जुलै रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

 

22 जुलै रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

चंद्रपूरदि. 21 : जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रातील रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रमॉडेल करिअर सेंटरव सरदार पटेल महाविद्यालयचंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 22 जुलै रोजी सकाळी 11 वाजता सरदार पटेल महाविद्यालय येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यातून एक हजारहून अधिक विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. मेळाव्यात राज्यातील नामांकित खाजगी व औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या थेट सहभाग घेणार आहेत. दहावीबारावीआय.टी.आयपदविकापदवीधारक यांसाठी योग्यतेनुसार विविध रिक्त पदांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे.

रोजगार देणाऱ्या प्रमुख कंपन्या : ओमॅट वेस्ट प्रा.लि.एशियन सोलर प्रा.लि.महाराष्ट्र कार्बन प्रा.लि.गोपानी आयर्न अँड पॉवर इंडिया प्रा.लि.भावना एनर्जीडेक्सॉन इंजिनिअरिंग (नागपूर)सनफायर सिल्डताज बेव्हरेजवैभव इंटरप्रायझेस (नागपूर)विदर्भ क्लिक 1 सोल्युशनजे. पी. असोसिएट अँड लॅबोरेटरीजबोर्डवाला कोचिंग इन्स्टिट्यूटडी.एन.ए. नीट अकॅडमीसंसुर सृष्टी इंडियाभारत पेएस.बी.आय. लाईफएल.आय.सी. ऑफ इंडिया आदी.

उमेदवारांनी सोबत आणावयाची कागदपत्रे व प्रक्रिया : आधार कार्डशैक्षणिक अर्हतेची प्रमाणपत्रे (कमीत कमी 3 प्रती) पासपोर्ट साइज फोटो. उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर लॉगिन करून आपली शैक्षणिक पात्रतेनुसार पंडित दिनदयाळ उपाध्याय जॉब फेअर’ या पर्यायावर रिक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज करावा. इच्छुक नियोक्ते/कंपन्यांनीसुद्धा याच पोर्टलवर रिक्तपदे अधिसूचित करावीतया प्रमाणे नोंदणी प्रक्रिया पर्ण करावी.

येथे करा संपर्क : अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रचंद्रपूर दूरध्वनी क्रमांक  07172252295 वर संपर्क करावा व जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावाअसे आवाहन सहायक आयुक्त अ.ला. तडवी यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment