Search This Blog

Monday, 14 July 2025

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन

 जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन

Ø 21 जुलै 2025 रोजी महिलांसाठी विशेष संवाद व्यासपीठ

चंद्रपूरदि. 14 जुलै : समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध व्हावेतसेच त्यांच्या तक्रारी व अडचणींवर शासकीय यंत्रणेमार्फत प्रभावी मार्गाने कार्यवाही व्हावीयासाठी महिला व बाल विकास विभागामार्फत दरमहा "महिला लोकशाही दिन" राबविण्यात येतो.

सदर उपक्रमांतर्गतज्या महिलांना व्यक्तिगत स्वरूपाच्या तक्रारीअडचणी किंवा निवेदने आहेतत्यांनी महिला लोकशाही दिनाच्या 15 दिवसांपूर्वी आपली तक्रार दोन प्रतींत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारीचंद्रपूर यांच्या कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. प्राप्त तक्रारी संबंधित विभागांकडे कार्यवाहीसाठी पाठवून त्याचा योग्य निपटारा करण्यात येतो.

त्यानुसारजुलै 2025 महिन्यातील जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचा कार्यक्रम दिनांक 21 जुलै 2025 रोजी सोमवारदुपारी 1.00 वाजतामा. निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारीचंद्रपूर यांच्या दालनातजिल्हाधिकारी कार्यालयचंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. तसेच तालुकास्तरावरील महिला लोकशाही दिनाचे आयोजन महिन्याच्या चौथ्या सोमवार रोजी करण्यात येणार आहे.

सदर उपक्रमामार्फत महिलांना त्यांचे प्रश्न शासनदरबारी मांडण्याची संधी प्राप्त होत असूनसमस्याग्रस्त व पीडित महिलांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावाअसे आवाहन महिला व बाल विकास विभागचंद्रपूर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

00000

No comments:

Post a Comment