Search This Blog

Wednesday, 9 July 2025

राष्ट्रीय खनिज प्रतिष्ठान कार्यशाळेत "पारदर्शकता व अनुपालन" या मुद्द्यांवर चर्चा



 

राष्ट्रीय खनिज प्रतिष्ठान कार्यशाळेत "पारदर्शकता व अनुपालन" या मुद्द्यांवर  चर्चा

चंद्रपूर जिल्ह्यातील कार्पेट प्रकल्पासाठी  जिल्हाधिकारी सन्मानित

चंद्रपूर,  दि. 9  : खनिज मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील जिल्हा खनिज प्रतिष्ठान (DMF) कार्यशाळेचे आयोजन  नवी दिल्ली येथे करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील कार्पेट प्रकल्पासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांचा सदर कार्यशाळेत सत्कार करण्यात आला

या एकदिवसीय कार्यशाळेचा मुख्य उद्देश जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या उपक्रमांचा परस्पर अभ्यासअधिकाऱ्यांची कार्यक्षमता वाढविणे आणि प्रधानमंत्री खानिज क्षेत्र कल्याण योजना (PMKKKY) च्या प्रभावी अंमलबजावणीस गती देणे हा होता.

कार्यशाळेदरम्यान पारदर्शकता व अनुपालन या विषयावर सखोल चर्चा झाली. यात मुख्यतः DMF योजनांच्या अंमलबजावणीत आढळणाऱ्या त्रुटीसंभाव्य धोके तसेच या योजनांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आवश्यक असलेल्या अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांची सविस्तर मांडणी करण्यात आली.

चर्चेमधून मिळालेल्या महत्त्वपूर्ण शिफारशींमुळे भविष्यातील धोरणनिर्मितीस दिशा मिळणार असून DMF योजना अधिक प्रभावीपारदर्शक व लोकाभिमुख करण्यासाठी मार्गदर्शन झाले आहे. या कार्यशाळेत सहभागी अधिकाऱ्यांना विविध राज्यातील यशस्वी उपक्रमांची माहिती घेण्याची संधी मिळाली.

विशेष म्हणजेया राष्ट्रीय कार्यशाळेत चंद्रपूर जिल्ह्यातील महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे राबविण्यात येत असलेल्या कार्पेट निर्मिती प्रकल्पाचे स्टॉलही आकर्षणाचे केंद्र ठरले. या उपक्रमाद्वारे स्थानिक महिलांना रोजगार उपलब्ध होत असून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळत आहे.

सदर कार्यशाळा ही खनिज क्षेत्रातील सामाजिक विकासाची प्रभावी साधने म्हणून DMF च्या भविष्यातील वाटचालीस निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे.

00000

No comments:

Post a Comment