Search This Blog

Friday, 4 July 2025

आदिवासी उमेदवारांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

 

आदिवासी उमेदवारांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

चंद्रपूरदि. 4 : राज्य शासनाच्या वर्ग-3 व वर्ग-4 पदाकरीता घेतल्या जाणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रचंद्रपूर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर शिकवणी 1 ऑगष्ट 2025 पासून सुरु होणार आहेसदर प्रशिक्षण 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत सुरू राहणार आहे.

अनुसूचित जमातीच्या (ST) प्रवर्गातील उमेदवारांनी 29 जुलै 2025 पर्यंत आदिवासी "उमेदवारांकरीता कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रप्रशासकीय भवनचंद्रपूर या कार्यालयात आधार कार्डशैक्षणिक कागदपत्रेजातीचे पत्राणपत्र व बँकेचे पासबुक या कागदपत्राच्या छायाप्रतीसह नोंदनी फॉर्म भरून द्यावेनोंदणी केलेल्या उमेदवारांची 30 जुलै रोजी मुलाखत (Interview) राहील व 31 जुलै रोजी निवड यादी प्रसिध्द करण्यात येईल,

निवड झालेल्या उमेदवारांचे ऑगष्ट 1 पासून नियमित वर्ग चालू होईलसदर मार्गदर्शन केंद्रात गणित, इंग्रजी,  सामान्यज्ञान, बुद्धीमता चाचणी असे चार विषय शिकविले जातात सोबतच चार पुस्तकाच्या संचासह हजार (एक हजार रुपयेप्रतीमाह विद्यावेतन दिले जातेयाबाबत अधिक माहितीसाठी मनोज सिडाम 9764580986  या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करावाजिल्हातील सर्व आदिवासी उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावाअसे आवाहन कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी रोशन गभाले यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment