Search This Blog

Friday, 11 July 2025

15 जुलै रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

 

15 जुलै रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय  रोजगार मेळाव्याचे आयोजन

चंद्रपूरदि.11 जुलै :  जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,  मॉडल करीअर सेंटरआणि विवेकानंद महाविद्यालयभद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने 15 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन विवेकानंद महाविद्यालय भद्रावती येथे  करण्यात आले आहे.

10 वी12 वीआय.टी.आय.पदविकापदवी इत्यादी बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेराज्यांतील नामांकीत उद्योजकांचा थेट नोकरी इच्छुक उमेदवारांशी संपर्क करण्याच्या दृष्टीने, सदर रोजगार मेळावा आयोजित आहे

या मेळाव्यामध्ये विविध नामांकित कंपन्या सहभागी होत आहे. यात ओमॅट प्रा.लि. चंद्रपुर यांचे बॉइलर ऑपरेटरकेमिस्टफिटरवेल्डरफिल्ड ऑपरेटरइलेक्ट्रिशिअनवेलफेअर ऑफिसरट्रेनि इत्यादीमल्टी ऑरगॅनिक प्रा.लि.चंद्रपूर हेल्परफिटरवेल्डरके. एल. गृपहैद्राबादयांचे वेअर हाऊस असोसिएटसेक्युरिटी गार्डमहाराष्ट्र कार्बन प्रा.लि. चंद्रपूर यांचे ट्रेनिविदर्भ क्लिक । सोल्युशनचंद्रपूर यांचे फिटरवेल्डरइलेक्ट्रिशिअनसनफायर प्रा.लि. चंद्रपूर यांचे फायरमॅनभावन एनजी प्रा. लि. चंद्रपूर यांचे मॅनेजर जे.पि.असोसिएट अॅन्ड लॅबोरेटरीज प्रा.लि. चंद्रपूर यांचे एमएससी केमिस्टएस.बी.आय. लाईफ इंन्सूरन्स चंद्रपूरयांचे फिल्ड वर्करडेक्सॉन इंजिनिअरींग प्रा.लि. नागपूरयांचे मोटार मॅकेनिकलइलेक्ट्रिशिअनडिझेल मॅकेनिकलवैभव इंटरप्रायझेसनागपूर यांचे आय. टी. आय विद्यार्थ्यांकरीता मॅकेनिकलसंसुर सृष्टी प्रा.लि. चंद्रपूर यांचे बॅच मॅनेजरफिल्ड एक्झुकेटीव्ह इत्यादी कंपन्याचे विविध पदे असल्याचे उद्योजकाकडुन कळविण्यात आलेले आहे.

मेळाव्याकरीता उमेदवारांनी आधारकार्ड व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्राचे झेराक्स प्रतीसह (कमीत कमी तीन प्रती) उपस्थित राहावे. मेळाव्यामध्ये सहभागी होण्याकरीता https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाइटवर नोंदणी करावी. भरती इच्छुक नियोक्ते यांनी जास्तीत जास्त रिक्तपदे https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर  अधिसूचीत करावी. नोकरी इच्छुक उमेदवारांनी सदर वेबपोर्टलवर नोंदणी करावी तसेच लॉगीन करून शैक्षणिक पात्रतेनुसार अप्लाय करावा. अधिक माहीतीकरीता जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रचंद्रपूर दुरध्वनी क्रमांक ०७१७२- २५२२९५ येथे संपर्क करावा.

 जिल्हातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी होण्याचे व मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त अ.ला. तडवी यांनी केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment