Search This Blog

Tuesday, 8 July 2025

जिल्हा परिषदेकडून दिव्यांग व मागासवर्गीयांसाठी कल्याणकारी योजना जाहीर

 

जिल्हा परिषदेकडून दिव्यांग व मागासवर्गीयांसाठी कल्याणकारी योजना जाहीर

अर्ज सादर करण्यास १५ जुलैपर्यंत मुदत

चंद्रपूरदि. ०८ जुलै  : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत आर्थिक वर्ष २०२५-२६ करिता दिव्यांग व मागासवर्गीय नागरिकांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येणार आहेत. इच्छुक लाभार्थ्यांनी १५ जुलै २०२५ पर्यंत संबंधित ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये अर्ज सादर करावाअसे आवाहन करण्यात आले आहे.

दिव्यांगांसाठी ५ टक्के निधी अंतर्गत तीन चाकी सायकलपांढरी काठीश्रवणयंत्रस्वयंचलित सायकलकमोड चेअरई-रिक्शा व विवाहित जोडप्यांना प्रोत्साहनपर अनुदान या योजनांचा समावेश आहे. तर मागासवर्गीयांसाठी २० टक्के निधी अंतर्गत ९० टक्के अनुदानावर सबमर्सिबल पंप व ऑईल इंजिनमहिलांसाठी सोलर दिवे आणि लघुउद्योगासाठी ७५ टक्के अनुदानावर ई-रिक्शाझेरॉक्स मशिन इत्यादींचा लाभ देता येणार आहे.

या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. तसेच सर्व प्रकल्प डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) प्रणालीद्वारे राबविले जाणार असल्याने लाभार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती अद्ययावत असणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी संबंधित ग्रामपंचायतपंचायत समिती कार्यालय किंवा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाशी संपर्क साधावाअसे कळविण्यात आले आहे.

0000000

No comments:

Post a Comment