Search This Blog

Tuesday, 22 July 2025

रानभाजी महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

 रानभाजी महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

चंद्रपूरदि. 22 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचंद्रपूर द्वारे आयोजित रानभाजी महोत्सवाला चंद्रपूरकरांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला असून दररोज सरासरी एक लाख रुपयांची आर्थिक उलाढाल या महोत्सवादरम्यान अनुभवास मिळाली.

शहरातील मौलाना अबुल कलाम आझाद गार्डन येथे 18 जुलै रोजी रानभाजी महोत्साचे उद्घाटन झाल्यनंतर सलग पाचही दिवस शहरातील नागरीकनामवंत व्यक्तीडॉक्टर्सवकीलप्राध्यापकपर्यावरणप्रेमीशाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच विविध शासकीय विभागांतील अधिकारी-कर्मचा-यांनी या महोत्सवाला भेट दिली. तसेच येथील स्टॉलवरील उत्पादने आणि माळरानातील भाज्यांची खरेदी केली. 

जिल्ह्यातील रानभाज्या संकलन करणारे आदिवासी बांधवबचत गटमाविमआत्माउमेदवनधन विकास केंद्रफार्मर्स प्रोड्यूसर कंपनी इत्यादी संस्थांकडे नोंदणीकृत असलेले महिला व पुरूष बचतगट यांनी रानभाजी महोत्सवामध्ये भाग घेऊन आपल्या उत्पादनांची विक्री केली. या महोत्सवामध्ये दररोज सरासरी एक लाखापेक्षा अधिक रूपयांची आर्थिक उलाढाल होऊन आदिवासी बांधवांना त्याचा प्रत्यक्ष फायदा पोहोचला आहे.

या रानभाजी महोत्सवामध्ये रानभाजीरानफळेरानमेवावनौषधीअन्नधान्य इत्यादी क्षेत्रात उत्पादनसंकलनविपणन करणारे नोंदणीकृत आदिवासी बचतगटव्यक्तीसंस्था यांनी प्रकर्षाने सहभाग नोंदविला. शेती किंवा निगा न करता निसर्गत:च उगवलेल्या व विशेषकरून चंद्रपूर जिल्ह्यामधील रानावनातूनबांधावरून गोळा केलेल्या शेरडीरेमशरूमटेकोडेकाटवलपांढरा कुडाकुळमुळीकेनाकोंबडातरोटाधानभाजीपातूरगोपणटट्टूची फुलेकेनाचुचूरइकदोडेपानवेलमसाला पानबांबूवाष्टेभराटी,  मटारू,  राजगिरारानआलेरानकोचईरानमटाळूवाघोटीरानकोचई इत्यादी रानभाज्या व रानफळे तर पानफुटीकांडवेलगुळवेलअमरवेलअश्वगंधापळसअर्जून अश्या औषधी वनस्पती प्रदर्शनास व विक्रीस उपलब्ध होत्या. विविध पारंपारीक आदिवासी खाद्यपदार्थांचे स्टॉल्सदेखील या महोत्सवादरम्यान लावण्यात आले होते. वनधन केंद्रांनी मोहफुलांपासून बनविलेले विविध पदार्थबांबुपासून बनविलेली उत्पादने देखील ठेवण्यात आली होती. तद्वतच शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ यांचेकडील शबरी नॅचरल ब्रँडची विविध उत्पादने प्रदर्शन व विक्रीस ठेवण्यात आली होती.

प्रकल्प अधिका-यांनी मानले चंद्रपूरकरांचे आभार : आझाद गार्डन येथे आयोजित केलेल्या रानभाजी महोत्सवास चंद्रपूर येथील नागरीकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन आदिवासी बांधवांना रोजगार मिळविण्यास मदत केली. त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केलेत्याबद्दल आदिवासी विकास विभागातर्फे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी सर्व नागरिकांचे आभार मानले.

000000

No comments:

Post a Comment