Search This Blog

Thursday, 3 July 2025

प्रधानमंत्री धरती आबा जनभागीदारी अभियानाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम


 प्रधानमंत्री धरती आबा जनभागीदारी अभियानाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम

Ø पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जुलै रोजी प्रियदर्शिनी सभागृह येथे आयोजन

चंद्रपूरदि. 3 : आदिवासी भागांमध्ये सेवा आणि पायाभूत सुविधांची परिपूर्णता सुनिश्चित करणेहा प्रधानमंत्री धरती आबा जनभागीदारी अभियानचा प्रमुख उद्देश आहेया अभियानामध्ये शासनाच्या 17 विभागांच्या 25 सेवांचा समावेश करण्यात आला असून 5 जुलै 2025 रोजी पालकमंत्री डॉअशोक उईके यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या अभियानांतर्गत प्रत्यक्ष ग्रामस्तरावर शिबिरांच्या माध्यमातून आधारकार्डरेशनकार्डआयुष्मान भारतकार्डजातीचे प्रमाणपत्रपीएम-किसानजनधनखातेकाढणे अशा सेवा देण्यात येणार आहेतचंद्रपूर जिल्ह्यात या शिबिरांचे आयोजन दिनांक 15 ते 30 जून दरम्यान करण्यात आले होतेत्या अनुषंगाने 5 जुलै रोजी सकाळी 11 वाजता प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहचंद्रपुर येथे प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान जिल्हास्तरीय कार्यक्रम आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉअशोक ऊईकेयांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे.

सदर कार्याक्रमास जिल्ह्यातील खासदारआमदार तसेच जिल्हाधिकारी व सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेतजिल्हास्तरीय कार्यक्रमास सर्व आदिवासी सामाजिक संघटनासामाजिक कार्यकर्ते व आदिवासी बंधु-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment