Search This Blog

Wednesday, 9 July 2025

धान खरेदीसाठी 20 जुलै पर्यंत मुदतवाढ


धान खरेदीसाठी 20 जुलै पर्यंत मुदतवाढ

चंद्रपूरदि. 09 जुलै : रब्बी पणन हंगाम 2024-25 अंतर्गत शेतकऱ्यांकडून धान्य व भरडधान्य खरेदी प्रक्रियेसाठी शासनाने दिलेली अंतिम मुदत आता 20 जुलै 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

अनेक शेतकऱ्यांची खरेदी BeAM (Buyer and Agricultural Market) पोर्टलवरील तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित राहिल्याने शासनाने धान खरेदीसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली धान्य विक्रीची नोंद पूर्ण करावीतसेच जिल्ह्यातील सहकारी संस्थाखरेदी केंद्रे आणि संबंधित यंत्रणांनीही या मुदतीचा लाभ घेऊन खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तत्काळ करावीअसे जिल्हा पणन अधिकारी, यांनी कळविले आहे.

000


No comments:

Post a Comment